आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्ट्रीट फाइट ट्रेनिंगद्वारे घडवणार महिला वॉरिअर्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरात मुलींवरील अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महावीर धुळधर यांनी ज्युनिअर महाविद्यालयातील मुलींना आत्मरक्षणाचे धडे देऊन ‘महिला वॉरिअर्स’ घडवण्याचा संकल्प केला आहे. यासाठी शहरातील प्रत्येक कॉलेजमधील 50 मुलींना थांग-ता मार्शल आर्ट अंतर्गत स्ट्रीट फायटिंगचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

भारतीय थांग-ता महासंघाच्या देशव्यापी तांत्रिक समितीचे प्रमुख अन् आजवर विदर्भातील दहा हजार मुलींना आत्मरक्षणाचे धडे देणार्‍या धुळधर यांनी मुलींमध्ये ‘वॉरिअर’ची मानसिकता तयार करणे गरजेचे असल्याचे सांगितले. त्यामुळेच आपण महाविद्यालये सुरू झाल्यापासून वर्षभर हा उपक्रम राबवणार आहोत, अशी माहिती दिली. संकटाचा सामना करण्याची मुलींची शारीरिक व मानसिक तयारी असावी, या दृष्टीने विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्याची क्षमता मुलींमध्ये विकसित करण्यात येणार आहे.

मुलींजवळ असते नैसर्गिक शस्त्र
मुलींकडे स्वत:चा बचाव करण्यासाठी नखं हे नैसर्गिक शस्त्र असते. मात्र, त्यांचा योग्यवेळी अचूकपणे कसा वापर करायचा, याचे त्यांना ज्ञान नसते किंवा घाबरल्याने काहीच सुचत नाही. अशावेळी न डगमगता आपल्याकडे असलेल्या या शस्त्राचा बचावासाठी कसा परिणामकारकपणे उपयोग करता येईल, याचे तांत्रिक प्रशिक्षण दिले जाणार आहे.

‘निडरता’ही महत्त्वाची
४आत्मरक्षणासाठी केवळ नखांसारखे शस्त्रच नव्हे, तर ‘निडरता’ही आवश्यक आहे. मनात जोपर्यंत धाडस निर्माण होणार नाही, तोपर्यंत मुली ‘निडर’ बनणार नाहीत. यासाठी आपण कुठे जायचे, कोणासोबत जायचे याचाही, त्यांनी विचार करायला हवा. सावधानता बाळगणेही तितकेच गरजेचे झाले आहे.
महावीर धुळधर, राज्य थांग-ता संघटना सचिव.