आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामगारांना वेतन न दिल्याने इंडिया बुल्स वीज प्रकल्पात तोडफोड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - इंडिया बुल्स औष्णिक वीज प्रकल्पातील ब्रदर कंपनीकडे कार्यरत पाचशे ते सहाशे कामगारांना तीन महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने संतप्त कामगारांनी शुक्रवारी सकाळी कार्यालयाची तोडफोड केली. प्रकरण चिघळल्याने पोलिसांची अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली.


इंडिया बुल्सची कंत्राटदार कंपनी म्हणून भेल काम पाहते. या कंपनीच्या अखत्यारित ब्रदर कंपनीचे कामकाज चालते. बॉयलरच्या देखभालीची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. ब्रदर कंपनीने 500 ते 600 कामगारांचे मागील तीन महिन्यांपासूनचे वेतन काढले नाही. या कंपनीत बहुतांश कामगार परप्रांतीय आहेत. पोळ्याचा सण झाला, तरीही वेतन दिले नाही. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या कामगारांनी सकाळी 8 वाजतापासून काम बंद ठेवले. तसेच हातात दगड, लोखंडी रॉड, काठ्या घेऊन भेल, इंडिया बुल्सच्या साइट ऑफिसवर हल्लाबोल करून काचा फोडल्या. बाहेर उभ्या असलेल्या वरिष्ठांच्या चारचाकी वाहनांचे तसेच शेकडो संगणकांचे नुकसान केले. ही तोडफोड 8 ते 12 पर्यंत सुरू होती.


परिस्थिती चिघळल्यामुळे इंडिया बुल्स प्रशासनाने पोलिसांना माहिती दिली. येथे पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. अपर पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी कामगार, इंडिया बुल्स प्रशासन आणि ब्रदर कंपनीच्या अधिका-यांशी चर्चा केली.