आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • World Sports Day Special Diksha Gaikwad Interview

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारोत्तोलनासाठी सोयी नाहीत, राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णकन्या दीक्षाची खंत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - अमरावती शहरात ऑलिम्पिक दर्जाची सोय तर सोडाच; राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होता येईल, इतपत व्यवस्थित सोय असलेले जिमही नाही. मग या खेळात युवकांना भविष्य कसे घडविता येईल, अशी खंत दीक्षा गायकवाड हिने व्यक्त केली.

युवा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील भारोत्तोलन या क्रीडा प्रकारात देशाचे नाव उज्‍जवल करताना स्नॅच, क्लीन अँण्ड जर्क असे ‘ओव्हरऑल’ सुवर्णपदक पटकावले. आई-वडिलांचे प्रोत्साहन आणि स्वकर्तृत्वाच्या बळावर दीक्षाने हे यश मिळवले. मात्र, याचे तिला फार कौतुक नाही. शहरात भारोत्तोलन या क्रीडा प्रकारात घडत असलेल्या नव्या पिढीसाठी पुरेशा सोयी नाहीत. इंग्लंड येथे 2014 मध्ये होऊ घातलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या तयारीला मी आतापासूनच सुरुवात केली असून, 53 किलो वजनगटात मी सहभागी होणार आहे. तत्पूर्वी मार्च 2014 मध्ये राष्ट्रीय भारोत्तोलन स्पर्धेत सहभागी व्हायचे आहे. या स्पर्धेद्वारेच राष्ट्रकुल स्पर्धेसाठी मला पात्रता निकषानुसार सिद्ध व्हायचे आहे. सध्या स्नॅचमध्ये मी 77 किलो अन् क्लीन अँण्ड र्जकमध्ये 100 किलो, असे एकूण 177 किलो वजन उचलते. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताला पदक जिंकून देण्यास ही कामगिरी पुरेशी असल्याचेही ती म्हणाली.

स्वत:चा सराव सुरू असताना शहरात आणखी काही भारोत्ताेलक घडवण्याचा विडा दीक्षाने उचलला आहे. यासाठी ती जवाहर व्यायाम प्रसारक मंडळातील भारोत्ताेलकांना नि:शुल्क प्रशिक्षण देत असते. भावी पिढीला मदत व्हावी म्हणून तिने स्वत: खर्च करून सरावासाठी बार्वेल सेट (भारोत्तोलन ाच्या सरावासाठी आवश्यक साहित्य) भेट दिले आहेत. शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी असाव्यात, यासाठी ती मनापासून झटत आहे. शहारात दर्जेदार सोयी, प्रशिक्षण व प्रशिक्षकांचा अभाव असल्यामुळे खेळाडूंना एक तर पुणे, मुंबई किंवा दिल्लीची वाट धरावी लागते. विदर्भातच आंतरराष्ट्रीय दर्जाची सोय नसल्यामुळे मी स्वखर्चाने सांगली येथे प्रशिक्षण घेतले. सर्वांनाच अशाप्रकारे बाहेर जाऊन प्रशिक्षण घेणे शक्य होत नाही. त्यामुळे अनेकजण अध्र्यातच हा खेळ सोडतात. शिवाय प्रोटिन, फूड सप्लिमेंट्स असा संतुलित आहार घेण्यासाठीही मोठय़ा प्रमाणावर खर्च करावा लागतो. मी पुरस्कार रकमेतील सुमारे 10 लाख खचरून शहरातील कैलासनगर भागात स्वत:साठी जिम उघडले. सर्वप्रथम जागा खरेदी करून त्यावर खोली बांधली; तसेच पूर्ण साहित्यही स्वत:च खरेदी केले. पाठीवर शाबासकीची थाप ठेवणार्‍यांनी कधीही मदतीसाठी हात पुढे केला नाही. वडील व भावानेच पर्शिम घेत पूर्ण सहकार्य केल्याची भावना दीक्षा गायकवाडने व्यक्त केली.

आंतरराष्ट्रीय खेळाडू बनणे ही तशी साधी बाब नाही. खानपानाच्या सवयींवर नियंत्रण ठेवावे लागते. भारोत्तोलन हा वजन तोलण्याचा खेळ असल्यामुळे प्रोटीन, मास, चिकन, दूध, अंडी, फळं असा पोषक आहार लागतो. मसालेदार अन् वजन वाढवणारे पदार्थ मात्र टाळावे लागतात. यासाठी मोठा खर्च होत असतो. मात्र, वडील तो सहर्ष सहन करतात, असा आदरही दीक्षाने व्यक्त केला.