आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चुकीचे रक्त दिल्याने महिलेचा बुलडाण्‍यात मृत्यू

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुलडाणा - रेश्मा अंजूम शेख इलियास (35) हिला गुरुवारी शासकीय रुग्णालयातील डॉक्टरने चुकीचे रक्त दिले. त्यामुळे तिचा मृत्यू झाला, असा आरोप नातेवाइकांनी केला आहे.


छातीत वेदना होत असल्याने बुधवारी रेश्माला रुग्णालयात दाखल केले होते. शरीरात रक्त कमी असल्याने डॉक्टरांनी तिच्या नातेवाइकांना ‘ए पॉझिटिव्ह’ रक्ताची आवश्यकता असल्याचे सांगितले. त्यानुसार नातेवाइकांनी रक्त पिशवी उपलब्ध करून दिली. गुरुवारीसुद्धा नातेवाइकांनी ब्लड बॅँकेतून रक्त आणून दिले. या वेळी डॉक्टरांनी या रक्तपिशवीची तपासणी न करताच महिलेस रक्त चढवले. मात्र दुपारी महिलेची तब्येत खालावली. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकारामुळे महिलेच्या नातेवाइकांनी दवाखान्यात गोंधळ घातला.