आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Yakub Menon Completed Post Graduation In Jail From IGNOU

याकूब मेमन, एमए बॉम्बस्फोटवाला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- 1993 मधील मुंबई बॉम्बस्फोटातील फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेला आरोपी याकूब मेमन याने इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून इंग्रजी विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. त्याच्यासोबत जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या इतर सात जणांनीदेखील असेच यश मिळवले आहे.

मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी मेमनला सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली असून तो सध्या नागपूर मध्यवर्ती तुरुंगात आहे. विद्यापीठाचा पदवी प्रदान सोहळा दिल्ली येथे होणार आहे. मात्र, सुरक्षेच्या कारणामुळे मेमनला या कार्यक्रमासाठी परवानगी देण्यात येणार नसल्याचे तुरुंग प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. तुरुंग प्रशासनाने परवानगी दिली तर त्याला वैयक्तिकरीत्या पदवी प्रदान करण्यात येईल, असे विद्यापीठाचे विभागीय अधीक्षक डॉ. शिवस्वरूप यांनी सांगितले. मेमनने याआधी सीएपर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. गेल्या वर्षी इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाकडून त्याने इंग्रजी विषयात मास्टर्स इन आटर्समध्ये द्वितीय श्रेणीत पदवी संपादन केली आहे.