आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

यमाजी मालकर, जयप्रकाश पवार यांना पुरस्कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - महाराष्ट्र संपादक परिषदेतर्फे दैनिक ‘दिव्य मराठी’चे सल्लागार संपादक यमाजी मालकर व नाशिक आवृत्तीचे निवासी संपादक जयप्रकाश पवार यांना पुरस्कार जाहीर झाले आहेत.

ज्येष्ठ संपादक पुरस्काराचे मानकरी यमाजी मालकर ठरले. 21 हजार रुपये, स्मृतिचिन्ह असे त्याचे स्वरूप आहे. तसेच जयप्रकाश पवार, निखिल वागळे (आयबीएन लोकमत, मुंबई), धनंजय राजे (ठाणे), मल्हार अरणकल्ले (सकाळ, पुणे), आबा माळकर (आपले महानगर, मुंबई), किशोर जामकर (सकाळ, नागपूर), वासुदेव कुळकर्णी (ऐक्य, सातारा), राजा माने (लोकमत, सोलापूर), आणि विजय शेट्टी (तरुण भारत, सिंधुदुर्ग) यांनाही पुरस्कार जाहीर झाले. 5 सप्टेंबर रोजी पुण्यात पुरस्कार वितरण होणार आहे.