आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Yatamal Byelection Congress Candidate Nandini Parvekar Ahead

यवतमाळमध्ये कॉँग्रेसच्या नंदिनी पारवेकर विजयी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ- यवतमाळ विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत कॉँग्रेसच्या उमेदवार व दिवंगत आमदार नीलेश पारवेकर यांच्या पत्नी नंदिनी पारवेकर यांचा विजय झाला. त्यांनी भाजपचे उमेदवार मदन येरावार यांचा 15 हजार 233 मतांनी पराभव केला.

गेल्या वेळी निलेश पारवेकर यांनीही येरावार यांचा 19 हजार मतांनी पराभव केला होता. मात्र निलेश यांच्या निधनामुळे या मतदारसंघात 2 जून रोजी पोटनिवडणूक घेण्यात आली. बुधवारी सकाळी आठ वाजता चोख पोलिस बंदोबस्तात मतमोजणीला सुरूवात झाली. शेवटच्या फेरीअखेर नंदिनी पारवेकर यांना 62509 तर युतीचे मदन येरावार यांना 472७6 मते मिळाली. विजयानंतर कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच जल्लोष सुरू केला. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, रोजगार हमी योजना मंत्री नितीन राऊत, विधानसभेचे उपाध्यक्ष वसंत पुरके, आमदार वामनराव कासावार, माजी खासदार हरिभाऊ राठोड, राहुल ठाकरे आदी नेतेमंडळीही जल्लोषात सहभागी झाली होती.

आघाडीत बिघाडी
या निवडणुकीत राष्ट्रवादीने कॉँग्रेसला पाठिंबा दिला होता, मात्र मतमोजणी सुरू होण्यापासून तर निकाल जाहीर होण्यापर्यंत राष्ट्रवादीचा कोणीही पदाधिकारी फिरकला नाही. अगदी निवडणुकच्या दिवशीही कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी बूथवर एकत्रित काम केले नाही. प्रचारात देखील राष्ट्रवादीचे नेते सहभागी नव्हते.

श्रद्धांजली अन् बर्थ डे गिफ्ट
दिवंगत नीलेश पारवेकर यांचा बुधवारी वाढदिवस होता. त्यामुळे आजचा विजय त्यांना श्रद्धांजली असेल तसेच बर्थ डे गिफ्टही असेल, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होती. निलेश यांच्या आठवणींना उजाळा देत विजयी मिरवणुक न काढण्याचा निर्णय कॉँग्रेसच्या नेत्यांनी घेतला.