आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

यवतमाळ जिल्ह्यात शेतकर्‍याचे आत्मदहन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - या वर्षी पावसाळा कमी झाल्याने पाच एकर कोरडवाहू शेतीमध्ये फक्त तीन क्विंटल कापसाचे उत्पादन झाले. दरम्यान, कर्जामुळे हताश झालेल्या मुलीच्या विवाहाच्या चिंतेने ग्रासलेल्या भांब येथील शेतकर्‍याने अंगावर केरोसीन ओतून आत्मदहन केल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी दुपारी वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले आहे.

आनंदराव साहेबराव पंडागळे (वय ४५) असे या शेतकर्‍याचे नाव आहे. नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकर्‍यांनी स्वत:चे सरण रचून आपली जीवनयात्रा संपवणे आता सुरू केले आहे. अशी घटना यापूर्वीच घडली आहे. भांब येथील शेतकरी आनंदराव पंडागळे यांनी आपल्या पाच एकर कोरडवाहू शेतीत कापसाची लागवड केली, परंतु या वर्षी पावसाने दगा दिल्याने पाच एकरात केवळ तीन क्विंटल कापूस झाला.

या शेतकर्‍यावर फुलसावंगी सेंट्रल बँकेचे ५० हजार रुपये कर्ज आहे. या कर्जामुळे तसेच मुलीच्या लग्नाच्या चिंतेमुळे बुधवारी घरी कुणी नसल्याची संधी साधून आनंदराव यांनी अंगावर केरोसीन टाकून पेटवून घेतले. या शेतकर्‍याला तीनही मुलीच आहे. नेहा ही दहाव्या वर्गात शिक्षण घेत आहे तर दुसरी मुलगी गायत्री ही आठव्या वर्गात आहे. तिसरी मुलगी पूजा ही सहाव्या वर्गात शिक्षण घेत आहे. या शेतकर्‍याच्या मागे पत्नी सुलोचना तसेच बराच मोठा परिवार आहे. महागाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली असून, तपास सहायक पोलिस निरीक्षक संतोष गोसावी करत आहेत.