आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Yavatmal Grampanchayat Election News In Divya Marathi

जिल्ह्यात ४३४ ग्रामपंचायतींमध्ये रणधुमाळी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - जिल्ह्यातील१२०७ ग्रामपंचायतींपैकी ४३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका येत्या २२ एप्रिल रोजी पार पडणार आहेत. त्या ग्रामपंचायतींमध्ये हजार ८४७ जागांसाठी तब्बल हजार ६२६ उमेदवार गुढग्याला बाशिंग बांधून रिंगणात उतरले आहेत. त्यासोबतच ११०६ उमेदवार अविरोध विजयी झाले आहेत. त्यामुळे हा ग्रामपंचायत निवडणुकीचा रणसंग्राम चांगलाच तापणार असल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यात असलेल्या ग्रामपंचायतींपैकी ४८६ ग्रामपंचायतींचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत असल्याने त्या ठिकाणी पहिल्या टप्प्यात सार्वत्रिक निवडणुका घेण्यात येणार होत्या. मात्र या ग्रामपंचायतींपैकी ४० ग्रामपंचायती या अविरोध झाल्याने आणि काही ठिकाणी उमेदवारी अर्जच दाखल झाल्याने आता त्यापैकी ४३४ ग्रामपंचायतींच्या निवडणूका पार पडणार आहेत. त्याचप्रमाणे या ग्रामपंचायतींपैकी हजार ९५३ जागांसाठी निवडणूक होणार होती. मात्र त्या जागांपैकी एक हजार १०६ उमेदवार अविरोध विजयी झाल्याने आता केवळ हजार ९५३ पैकी हजार ८४७ जागांसाठी ही निवडणूक पार पडणार आहे. या जागांसाठी हजार ६२६ उमेदवार रिंगणात उतरले असून २२ एप्रिल रोजी त्यांच्या भविष्यावर शिक्कामाेर्तब होणार आहे.

ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत यंदा जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी रस दाखवला आहे. मोठ-मोठे पुढारी या निवडणुकांवर बारीक लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकाही विशेष ठरणार आहेत. त्यातच आता निवडणुकीसाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक राहीला असल्याने गावागावात गटबाजीचे राजकारण सुरू असून प्रचाराला रंग चढला आहे.

केवळ ठिकाणी पोटनिवडणूक :
जिल्ह्यात८१ ठिकाणी पोटनिवडणूक होणार होत्या. त्यात १९ जागी एकेकच अर्ज प्राप्त झाल्याने ते १९ उमेदवार अविरोध विजयी झाले. त्यासोबतच ५७ ठिकाणी एकही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नसल्याने आता ८१ पैकी केवळ ठिकाणच्या जागांसाठी पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे.

नगरपंचायत निवडणूक तिढा कायम :
जिल्ह्यातीलसहा मोठ्या ग्रामपंचायतींचे नगर पंचायतीमध्ये रुपांतर करण्यात येणार असल्याची अधिसूचना नुकतीच जारी करण्यात आली आहे. या सहा मोठ्या ग्रामपंचायतींपैकी दोन ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. मात्र त्यांच्या नगरपंचायतींची अधिसुचना जारी झाल्यानंतरही निवडणूक रद्द करण्यासंदर्भात अद्याप कुठलेही आदेश प्रशासनाला प्राप्त झाले नाही. त्यामुळे त्या ठिकाणी निवडणुकांची तयारी सुरूच असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.