यवतमाळ - यवतमाळ जिल्हा परिषदेतील नोकर भरती परीक्षेचा पेपर फुटलेला पेपर रद्द करण्याची घोषणा जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी मंगळवारी केली. या प्रकरणाच्या चौकशीसाठी औरंगाबाद पोलिस यवतमाळात दाखल झाले आहे. जप्त उत्तर तालिका परीक्षेत वापरलेल्या प्रश्नपत्रिकेशी जुळल्याचे पोलिसांनी सांगितले.
२ नोव्हेंबर रोजी कनिष्ठ अभियंता, कृषी विस्तार अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, तसेच तारतंत्री या पदांच्या भरतीसाठी लेखी परीक्षा पार पडली. मात्र, परीक्षेच्या आदल्या दिवशी औरंगाबादेत ११ आराेपींना अटक करून उत्तर तालिका जप्त केल्या होत्या.
अकरा प्रश्नांची उत्तरे मागितली : औरंगाबादचे पोलिस अधिकारी मधुकर सावंत यांनी जिल्हाधिका-यांना अकरा प्रश्नांची उत्तरे मागितली आहे. यामध्ये पेपर कुणी व केव्हा काढला, स्ट्राँग रूम कुठे होती, या पेपरशी कोणाकोणाचा संबंध आला या प्रश्नांचा त्यात समावेश आहे.