आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Yavatmal\'s Mla Nilesh Parvekar Death In Accident

यवतमाळचे कॉंगेसचे आमदार नीलेश पारवेकर यांचे अपघाती निधन

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ- येथील काँग्रेस आमदार नीलेश देशमुख पारवेकर (44) यांचे रविवारी रात्री अपघाती निधन झाले. मतदारसंघाला भेट देऊन परतताना लाडखेड गावाजवळ त्यांच्या वाहनाला अपघात झाला. यात ते गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत त्यांना क्रिटिकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

प्रथम विधानसभेवर निवडून गेलेले पारवेकर मतदारांची भेट घेऊन परतत असताना रात्री 8.30 च्या सुमारास रस्त्यावर अचानक जनावर आल्यामुळे चालकाचा ताबा सुटून गाडी उलटली. यात आमदार पारवेकर यांच्यासोबत जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब मांगूळकर हेही जखमी झाले. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पारवेकर यांच्या पश्चात आई, बंधू, पत्नी आणि दोन मुली आहेत.