आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Yawatmal Congress MLA Nandini Bitten Her Mother In Law

आमदार सुनेची सासूला मारहाण, नंदिनी पारवेकर यांच्यावर गुन्हा दाखल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ - सासूला शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी यवतमाळच्या काँग्रेस आमदार नंदिनी पारवेकर यांच्याविरुद्ध वडगाव रोड पोलिस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल झाला. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या सासू कांताबाई यांनी पोलिसात तक्रार दिली होती.

पारवेकर कुटुंबातील सासू - सुनांचा गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला वाद पोलिसांत जाऊन पोहोचला आहे. आमदार नीलेश पारवेकर यांच्या निधनानंतर यवतमाळ विधानसभा मतदारसंघातून नीलेश यांचे बंधू योगेश यांना उमेदवारी मिळावी अशी इच्छा कांताबाई यांची होती. काँग्रेसने मात्र नंदिनी यांना उमेदवारी दिली. नेमक्या याच कारणाने सासू आणि सूनेत वितुष्ट आले. विशेष म्हणजे निवडणुकीनंतर नंदिनी घर सोडून किरायाच्या घरात राहत आहेत. दोन दिवसांपूर्वी महत्त्वाची कागदपत्रे घेण्यासाठी नंदिनी घरी गेल्या असता तेथे त्यांचा कांताबाई यांच्यासोबत वाद झाला. या प्रकरणी कांताबाई पारवेकर यांनी वडगाव पोलिसांत तक्रार दाखल केली होती. बुधवारी पोलिसांनी नंदिनी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.