आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काच महालात विराजणार यवतमाळचा राजा, हत्ती- घोडयासह निघणार मिरवणूक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ - यवतमाळचा राजा म्हणून सर्वदूर परिचीत असलेल्या मारवाडी चौक येथील गणपती या वर्षी काचेच्या महालात विराजमान होणार आहे . विशेष म्हणजे प्रतिष्ठापणेपूर्वी वाद्यांच्या निनादात शहरातून हत्ती-घोडे पालखीसह गणेशाची मिरवणूक काढण्यात येणार आहे .

नवयुवक गणेशोत्सव मंडळाचे 50 वे वर्ष आहे. त्या अनुषंगाने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. चिखली येथील जीवनलाल बाहेती हे काचेच्या महालाची निर्मिती करत आहे . या महालात तिन्ही बाजुने पाण्याचे धबधबे राहणार असून मंडपाची उंची 51 फूट असणार आहे. एक महीण्यापासून 30 कारागिर मंडप उभारण्यासाठी काम करत आहे. प्रतिष्ठापनेसाठी वनकर पेंटर साडे सात फुट उंचीच्या गणेश मुर्तीची निर्मिती करत आहे . विशेष म्हणजे 50 वर्षापासून एकसारखी मुर्ति तयार करण्यात येते. या ठिकाणी गणपतीसमोर ठेवण्यात येणारा 25 किलो वजनाचा मुषक भाविकांच्या आकर्षणाचा केंन्द्र राहणार आहे . या मुषकाच्या कानात आपली इच्छा व्यक्त केल्यास ती गणेश पूर्ण करतो अशी भाविकांची भावना आहे . गणेश चतुर्थीला भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. 108 सुहासीनी लाल रंगाच्या साडया परीधाण करुन शोभायात्रेत सहभागी होणार आहे. गरीब लोकांना या ठीकाणी रोज अन्नदान करण्यात येणार असून अखेरच्या दिवशी वस्त्र दान करण्यात येईल