आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Yawtmal District Rape Case FIR Against Tahsildar

यवतमाळ : मोलकरणीच्या मुलीवर तहसीलदाराचा अतिप्रसंग, गुन्हा दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - मोलकरणीच्या अल्पवयीन मुलीवर नायब तहसीलदाराने अतिप्रसंग केल्याची घटना महागाव येथे सोमवारी उघडकीस आली. याप्रकरणी नायब तहसीलदार देवचंद रामटेके याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महागाव तहसीलमध्ये कार्यरत असलेले नायब तहसीलदार देवचंद रामटेके यांच्या निवासस्थानी गेल्या महिन्यांपासून एक महिला घरकाम करते. २७ एप्रिल २०१५ रोजी या महिलेसोबत तिची अल्पवयीन मुलगी नायब तहसीलदारांच्या निवासस्थानी कामानिमित्त आली होती.
या वेळी किराणा दुकानातून सामान आणण्याचा बहाणा करून रामटेकेने महिलेला बाहेर पाठवले. एकटी असल्याची संधी साधून सदर मुलीवर अतिप्रसंग केला. तसेच याबाबत कुणालाही माहिती दिल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली.
मात्र, भेदरलेल्या मुलीने घडलेल्या प्रकाराबाबत आपल्या आईला माहिती दिली. त्यानंतर पीडित मुलीच्या अाईने रामटेकेविरोधात पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून पाेलिसांनी गुन्हा दाखल केला अाहे.