आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Young Police Suicide Committed Under Railway In Nagpur

नागपुरात रेल्वेखाली उडी घेऊन तरुण पोलिसाची आत्महत्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - एका तरुण पोलिस शिपायाने धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. मनोज मेश्राम (२३, रा. सुगतनगर) असे मृताचे नाव आहे.
मनोज हा २०१२ मध्ये भरती झाला. तो नागपूर पोलिस मुख्यालयात कार्यरत होता. चार दिवसांपूर्वी त्याची बदली कामठी येथील पोलिस ठाण्यात झाली होती. मात्र, मनोज तिथे रुजू झाला नाही. बुधवारी रात्रीच्या सुमारास ताे पाचपावली परिसरातून जाणा-या रेल्वे मार्गावर फिरत होता. या ठिकाणी कामावर असलेला रेल्वे कर्मचारी मनाेज ठाकूर याने त्याला हटकले होते. यानंतर मनोज मेश्राम तेथून निघून गेला. काही वेळात त्याने नागपूर-बिलासपूर एक्स्प्रेससमाेर उडी घेतली. त्याच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकलेले नाही.