आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Youth Invented Non Subemarged Vessal On Overcoming Inabiltiy

तरूणांने अपंगत्व झुगारून न बुडणार्‍या जहाजाचे केले संशोधन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - अपंगत्वावर मात करून एका 22 वर्षीय तरुणाने न बुडणारे जहाज तयार केले आहे. केवळ ‘आयटीआय’चे शिक्षण घेतलेल्या वरुण मधुकर खंडारे याने तज्ज्ञ शास्त्रज्ञाप्रमाणे संशोधन केले.


परतवाडा येथील रहिवाशी असलेला वरूण डॉक्टरच्या चुकीमुळे बालपणीच पायाने अधू झाला. मात्र या परिस्थितीतही काहीतरी वेगळं करण्याच्या उद्देशाने त्याने न बुडणारे जहाज तयार करण्याचा निश्चय केला. त्सुनामीतही हे जहाज तुटले तरी बुडणार नाही. टायटॅनिकसारख्या भव्य जहाजालाही मी तयार केलेल्या ‘सेफ्टी डिव्हाइस’ची जोड मिळाली असती, तर ती दुर्घटना टळली असती, असा विश्वास त्याने व्यक्त केला.

सेफ्टी डिवाईसची किमया
खालच्या बाजुने छीद्र पडले तरी जहाज बुडणार नाही, अशी रचना वरूणने केली आहे. जहाजाला आधार देण्यासाठी त्याने आठ बॉक्सची व्यवस्था केली तयार आहे. तळाला सेंसर पॉइन्ट लावले आहेत. त्यामुळे जहाजाला धक्काही लागला तर चटकन संगणकावर सूचना मिळेल. त्यासाठी सर्व यंत्रणा अँटोमॅटिक आहे. अपघात घडण्यापूर्वी ही यंत्रणा पूर्वसूचना देईल. डिझेल, पेट्रोल संपले तरी जहाज स्वयंऊज्रेतून चालेल, असे संशोधन वरूणने तयार केले आहे.


खर्च 35 हजार रूपये
या अविष्काराचे वरूणने पेटेंट मिळविले आहे. त्याच्या पेटेंटचा क्रमांक 1633-एम यु एम-2012 हा असून भारत सरकारच्या वेबसाइटवरही उपलब्ध आहे. त्यासाठी त्याला 35,000 रूपयांचा खर्च आला.