आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नास नकार दिल्याने तरुणीकडून युवकाची चंपी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- प्रेमासाठी कोण कधी काय करेल याचा नेम नाही. याचा प्रत्यय नुकताच नागपुरात आला. एका 22 वर्षीय युवकाने रात्री उशीर झाल्याने 18 वर्षीय तरुणीला कारमधून घरी सोडले. काही तासांच्या भेटीतच तरुणी युवकावर फिदा झाली. यानंतर तिने थेट त्याला लग्नासाठी मागणी घातली. मात्र, युवकाने तिला अजिबात भाव दिला नाही. याचाच राग मनात धरून तिने मित्रांची मदत घेऊन त्याचे अपहरण करून टक्कल केले.


सचिन गोन्नाडे असे पीडित तरुणाचे नाव आहे. शहरात दोन दिवसांपूर्वी पल्स पोलिओ अभियान झाले. यात सदर तरुणीही सहभागी झाली होती. रात्री उशीर झाल्यामुळे सचिनने तरुणीला आपल्या कारमधून तिच्या घरी सोडले. काही तासांच्या भेटीत तरुणी युवकाच्या प्रेमात पडली. यानंतर दुसºया दिवशी तरुणीने युवकाला प्रपोज केले. मात्र, त्याने हा प्रस्ताव धुडकावून लावला. यामुळे संप्तत झालेल्या तरुणीने सहा मित्रांची मदत घेऊन सचिनला निर्जळस्थळी नेऊन त्याचे टक्कल केले. यानंतर सचिनने तरुणीची नागपूर पोलिसांत तक्रार केली.