आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवासेनेची जातपडताळणी कार्यालयात तोडफोड

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - दोन वर्षांपासून प्रलंबित असलेले जातपडताळणीची प्रकरणे मार्गी लागत नसल्याने संतप्त झालेल्या युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी विभागीय जातपडताळणी कार्यालयाची तोडफोड केली.


दोन वर्षांपूर्वी सादर केलेल्या प्रकरणांबाबत समाजकल्याण विभागाने कोणतीही कारवाई केली नसल्याच्या काही उमेदवारांच्या तक्रारी आहेत. सध्या बारावीचा निकाल लागल्याने पुढील प्रवेशासाठी प्रमाणपत्र मिळावे म्हणून मंगळवारी शेकडो विद्यार्थ्यांनी पालकांसह कार्यालयात गर्दी केली. याबाबत माहिती मिळताच युवासेनेला काही कार्यकर्त्यांनी कार्यालयाकडे धाव घेतली.

कार्यकर्त्यांनी संशोधन अधिकारी चव्हाण यांच्याशी चर्चा केली. मात्र, समाजकल्याण अधिका-यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने कार्यकर्त्यांनी कार्यालयात तोडफोड केली. त्यानंतर अधिका-यांनी प्रमाणपत्र वितरित करण्याची हमी देत चार वेगळी काउंटर्स उघडली. यासंदर्भात विचारणा करण्याकरिता समाजकल्याण विभागाच्या जनसंपर्क अधिका-यांशी संपर्क साधला असता त्यांचा भ्रमणध्वनी बंद होता.