आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवा सेनेचा ‘गोविंदा’ फोडणार रविवारी हंडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - अमरावतीकरांना दहीहंडीची प्रतीक्षा लागली असून, रविवारपासून हंडी फोडण्यासाठी रचण्यात येणार्‍या मनोर्‍यांचा थरार अनुभवता येणार आहे. युवा सेनेच्या वतीने जयस्तंभ चौकात रविवारी (दि. 24) दहीहंडीचे आयोजन करण्यात आल्याचे जिल्हाप्रमुख प्रवीण हरमकर यांनी सांगितले.

मुंबई, ठाण्यात गोविंदा आणि दहीहंडी खूपच प्रसिद्ध असून, तेथील प्रत्येकाच्या रक्तात हे भिनलेले आहे. अमरावतीमध्येही आता मोठ्या दहीहंड्यांचे आयोजन व्हायला लागले आहेत. मुंबई, ठाणेनंतर अमरावतीमध्ये गोविंदांचा थरार अनुभवास मिळत आहे. मागील वर्षी पोलिस आयुक्त अजित पाटील यांनी आधी परवानगी नाकारल्यानंतर मोठा वादंग निर्माण झाला होता. मात्र, त्यानंतर पोलिस आयुक्तांनी परवानगी दिली होती. युवा सेनेच्या प्रथम ठरणार्‍या गोविंदास तब्बल 51 हजार रुपयांचा प्रथम पुरस्कार दिला जाणार आहे. सर्वाधिक थर लावणार्‍या स्पर्धकास प्रथम पुरस्कार देत सन्मानित केले जाणार आहे. त्यानंतर दुसर्‍या क्रमांकाचा थर लावणार्‍या गोविंदांना द्वितीय पुरस्कार 31 हजार, तर 11 रुपयांचा तृतीय पुरस्कार दिला जाणार आहे. दहीहंडी स्पर्धेच्या निमित्ताने शिवसेनेचे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा प्रमुख प्रवीण हरमकर यांनी केले आहे.

वर्षभराची घ्यावी उसंत
राजकमल चौकातील दहीहंडीचा थरारक अनुभव घेण्यासाठी नागरिकांनी वर्षभराची प्रतीक्षा करावी.पुढच्या वर्षी पुन्हा नव्या उत्साहाने व नेहमीच्याच दमाने हे आयोजन केले जाईल. यावर्षी काही अपरिहार्य कारणास्तव हा उत्सव थांबवण्यात आला आहे.
संजय देशमुख, अध्यक्ष, नवयुवक विद्यार्थी संघटना.अमरावती.
बालगोपालांची होणार स्पर्धा
दहीहंडी स्पर्धेच्या निमित्ताने बालगोपालांनादेखील पुरस्कृत केले जाणार आहे. उत्कृष्ट वेशभूषा करणार्‍या बालगोपालांचा या वेळी युवा सेनेच्या वतीने सत्कार केला जाणार आहे. स्पर्धेच्या निमित्ताने येथे येणार्‍या प्रत्येक बालगोपालास भेटवस्तू दिली जाणार आहे.