Home | Maharashtra | Vidarva | Akola | Akolekar In Font Of Medical Trees

अकोलेकर पडलेय वनौषधींच्या प्रेमात

प्रतिनिधी | Update - Jul 19, 2013, 11:08 AM IST

घरातील बाग फुलवण्यासाठी अकोलेकर आता वनऔषधींच्या रोपांना पसंती देत आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या नागार्जुन वनौषधी प्रकल्पातून गेल्या वर्षभरात अकोलेकरांनी मोठय़ा प्रमाणात रोपांची खरेदी केली आहे.

 • Akolekar In Font Of Medical Trees

  अकोला - घरातील बाग फुलवण्यासाठी अकोलेकर आता वनऔषधींच्या रोपांना पसंती देत आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या नागार्जुन वनौषधी प्रकल्पातून गेल्या वर्षभरात अकोलेकरांनी मोठय़ा प्रमाणात रोपांची खरेदी केली आहे.

  कृषी विद्यापीठाच्या नागार्जुन वनौषधी उद्यानात दुर्मीळ औषधी वनस्पती जमा करून त्याचा संग्रह व संगोपन करण्यात आले आहे. सद्य:परिस्थितीत नागार्जुन उद्यानात 400 वनौषधींच्या विविध प्रजाती जतन केलेल्या आहेत. या विभागात अश्वगंधा, काळमेद्य, कवचबीच, सफेद मुसळी, कोरफड, लेंडी पिंपळी आदी पिकांवर लागवड तंत्र विकासाच्या दृष्टीने संशोधन कार्य सुरू आहे. नागार्जुन वनौषधी उद्यानात काही प्रमुख औषधी व सुगंधी वनस्पतीच्या विकसित वाणाच्या बियाणे व रोपे उत्पादनाचा कार्यक्रम राबवल्या जात आहे. निरनिराळ्या वनौषधींचे रोपे व बियाणे उपलब्ध आहे.
  औषधी व सुगंधी वनस्पती
  औषधी व सुगंधी वनस्पतीमध्ये अश्वगंधा, सर्पगंधा, सोनामुखी, कवचबीच, इसबगोल, काळमेद्य, लेंडी पिंपळी, सफेद मुसळी, शतावरी, कोरफड, कस्तुरी भेंडी, तिखाडी, गवती चहा, जावा सिट्रोनेलो आदींचा प्रामुख्याने समावेश आहे.

  अश्वगंधाला मागणी

  अश्वगंधाला नागरिकांकडून सर्वाधिक मागणी आहे. गेल्या वर्षी चार हजार 640 अश्वगंधाच्या रोपांची विक्री झाली होती. ऑगस्टच्या शेवटच्या किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात याची लागवड केल्या जाते.

Trending