Home | Maharashtra | Vidarva | Akola | cast certificate office clashes akola

जातपडताळणीसाठी कार्यालयात धक्काबुक्की

प्रतिनिधी | Update - Jul 20, 2013, 10:05 AM IST

जातपडताळणी प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2013 आहे.

 • cast certificate office clashes akola

  अकोला - जातपडताळणी प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2013 आहे. त्यामुळे विभागीय जातपडताळणी कार्यालयात शुक्रवारी नागरिकांची मोठी गर्दी झाली. या ठिकाणी रांगेमध्ये लागण्यासाठी नागरिकांमध्ये धक्काबुक्की झाली. या प्रकारामुळे गोंधळ उडाल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले.

  अमरावती विभागाचे विभागीय जातपडताळणी उपविभागीय कार्यालय अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आहे. अकोला, वाशिम व बुलडाणा या तीन जिल्ह्यांचा त्यामध्ये समावेश आहे. या तीन जिल्ह्यांची लोकसंख्या लक्षात घेता, या कार्यालयात अधिकारी व कर्मचार्‍यांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे नागरिकांना, शासकीय कर्मचार्‍यांना व विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. अशातच शासनाने जातपडताळणी प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2013 केल्याने, या कार्यालयामध्ये नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. शुक्रवारी रांगेमध्ये लागण्याच्या कारणावरून नागरिकांमध्ये किरकोळ धकाबुक्की झाली.

  एक महिन्यापासून अधिकार्‍यांची भेट नाही
  महिन्याभरात अधिकार्‍यांची भेट झाली नाही. 31 जुलैला प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत असल्यामुळे कसरत करावी लागत आहे. नागरिकांना प्रस्ताव लवकर मिळावे.’’ कुसूम इंगळे, परिचारिका , जि. अकोला.

  फाइल घेण्यास टाळाटाळ
  तीन ते चार दिवसांपासून आपल्या मुलीच्या जातपडताळणी प्रस्तावाची फाइल घेऊन आलो. परंतु, ती फाइल घेण्यास अधिकारी व कर्मचारी टाळाटाळ करीत आहेत. त्याचे समाधानकारक उत्तर अद्यापही मिळाले नाही.’’ लक्ष्मण सरोदे, चिखली. जि. बुलडाणा.

  नियोजनाचा अभाव
  जात पडताळणी विभागामध्ये नियोजनाचा अभाव आहे. दरुन येणार्‍यांना नागरिकांना या विभागातील कर्मचारी सौजन्याची वागणूक देत नाही. तालुक्याच्या ठिकाणी कार्यालय होणे गरजेचे आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय टळेल.’’ अशोक हलगे, शिक्षक, जगदंबा विद्यालय, भामदेवी जि. वाशिम.

Trending