आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Civil Amenesty Problems: Vehicles 86 Thousand, Traffic Police 33

प्रश्‍न नागरी समस्‍यांचाः अकोला शहरात वाहने 86 हजार, वाहतूक पोलिस 33

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - शहरात धावणार्‍या या वाहनांच्या नियंत्रणासाठी शहरात केवळ 76 वाहतूक पोलिस कार्यरत आहेत. वाहतूक शाखेत 73 पोलिस तैनात असले तरी यामध्ये 18 पोलिसांना प्रत्यक्ष वाहतूक नियंत्रणाव्यतिरिक्त काम करावे लागते. तसेच रोज 12 कर्मचार्‍यांची साप्ताहिक सुटी असते आणि 5 कर्मचारी रजेवर असतात. एवढेच नव्हे तर 5 कर्मचारी रोज विविध बंदोबस्तामध्ये व्यस्त असतात. त्यामुळे केवळ 33 पोलिसच प्रत्यक्ष वाहतूक नियंत्रणासाठी रस्त्यावर असतात. परिणामी शहरातील रस्त्यांची दुरावस्था आणि वाहनांना नियंत्रित करता-करता पोलिसांची दमछाक होत आहे.

वर्षभरात झाले 217 अपघात
2012 मध्ये अपघाताच्या एकूण 217 घटना घडल्या. यात 49 जणांना आपले प्राण गमवावे लागले. 2011 मध्ये अपघाताच्या 232 घटना घडल्या असून यामध्ये 52 जणांचा मृत्यू झाला. सन 2010 मध्ये अपघाताच्या 249 घटना घडल्या होत्या. यात 36 जणांचा मृत्यृ झाला. 2009 मध्ये अपघाताच्या 271 घटना घडल्या असून, यामध्ये 29 जणांचा मृत्यू झाला होता. गाडी चालवताना मोबाईलवर संभाषण करणे, वाहतूक नियमांचे होणारे उल्लंघन, भरचौकात प्रवासी भरणारे ऑटोरिक्षा, फोफावणारे अतिक्रमण, फेरीवाल्यांची वाढती संख्या या सार्‍यांमुळे मुख्य रस्त्याची रुंदी दिवसें-दिवस कमी होत आहे. यासर्व बाबी वाहनचालकांच्या जीवावर बेतत आहेत. यातच वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने शहराच्या रस्त्यांवरील भारही वाढत आहे.


550 जड वाहनांची होते वाहतूक
1150 एसटीची शहरातून होते वाहतूक
सिग्नलचे ‘वाजले की बारा’
शहरात विविध भागातील वाहतूक सुरळीत व्हावी या उद्देशाने 12 जागी सिग्नल यंत्रणा बसवण्यात आली आहे. यापैकी एकही सिग्नल सुरू नाही. परिणामस्वरुप वाहतूक पोलिसांची वाहतूक नियंत्रित करताना दमछाक होत आहे. तसेच वाहन चालकांचीही गैरसोय होत आहे.
‘किलर’ चौक
अशोक वाटिका, जेल चौक, अग्रसेन चौक, मदनलाल धिंग्रा या चौकांमध्ये अपघातांचे प्रमाण अधिक असल्याने हे चौक ‘किलर चौक’ म्हणूनच ओळखले जातात. या चौकात नेहमीच वाहतुकीची कोंडी होते.

दृष्टिक्षेप वाहतूक पोलिसांच्या ‘कर्तव्यावर’

चौकांत तैनात पोलिस
मदनलाल धिंग्रा चौक- 4
टॉवर चौक -4
अशोक वाटिका- 4
अग्रसेन चौक -2
जेल चौक -2
नेहरू पार्क -2
गांधी चौक -2
महाराणा प्रताप चौक -2
जीपीओ -2
सरकारी बगिचा-1
रेल्वेस्थानक -1
बसस्थानक -2
पेट्रोलिंग-5

1,056 व्हॅन

16 खासगी सर्व्हिस

22 टॅँकर्स

42 रुग्णवाहिका

713 ट्रक

2544 ट्रॅक्टर्स-ट्रेलर्स

40 स्कूल बस

451
स्टेज कॅरिजेस

3177 कार

2196 ऑटोरिक्षा

732 जीप

575 टॅक्सी

73
कॉन्ट्रॅक्स कॅरिजेस

74,463 दुचाकी
जिल्ह्याचाही पडतो भार
उपलब्ध कर्मचार्‍यांमध्ये वाहतूक नियंत्रणाचे नियोजन करण्यात येत आहे. शहरात इतर जिल्ह्यातूनही वाहने येतात. वाहतूक पोलिसांना या वाहनांचेही नियंत्रण करावे लागते. एस.एस. ठाकूर., वाहतूक निरीक्षक

अडथळ्यांची शर्यत
बेताल वाहतुकीमुळे रस्त्यावरून मार्ग काढताना वाहनचालकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. नियमांचे उल्लंघन, रस्त्यांची दुरवस्था अशी अडथळ्यांची कसरत अनेकांना करावी लागतेय.

नागरिक म्हणतात, दंडात्मक कारवाई करा
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍यांविरुद्ध पोलिसांनी दंडात्मक कारवाई करावी. वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी खड्डे बुजवावे आणि आवश्यकता असल्यास वाहतूक पोलिसांची संख्याही वाढविण्यात यावी. तरच यातून मार्ग निघेल. मंगेश साळवीकर, जयहिंद चौक.

वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. तसेच मनपा, पोलिस प्रशासनाने संयुक्तपणे वाहतूक नियंत्रणासाठी उपाय योजना कराव्यात. जेणेकरून वाहतुकीची कोंडी होणार नाही. संतोष लढ्ढा, जुने शहर.