Home | Maharashtra | Vidarva | Akola | claim of 10 lac after cylinder blast

सिलिंडर स्फोटानंतर मिळतो दहा लाखांचा दावा

प्रतिनिधी | Update - Jul 17, 2013, 09:34 AM IST

गॅस कनेक्शनधारकाला कंपनीतर्फे विम्याचे संरक्षण प्राप्त असते. त्यामुळे सिलिंडरमुळे दुर्घटना झाली किंवा ग्राहकाचा मृत्यू झाल्यास त्याला 10 ते 25 लाख रूपयापर्यंत नुकसान भरपाई मिळू शकते.

 • claim of 10 lac after cylinder blast

  अकोला- गॅस कनेक्शनधारकाला कंपनीतर्फे विम्याचे संरक्षण प्राप्त असते. त्यामुळे सिलिंडरमुळे दुर्घटना झाली किंवा ग्राहकाचा मृत्यू झाल्यास त्याला 10 ते 25 लाख रूपयापर्यंत नुकसान भरपाई मिळू शकते. मात्र त्यासाठी कंपनीकडे दावा करण्याची आवश्यकता असते. सामूहिक दुर्घटना घडल्यास 50 लाखापर्यंत लाभ होऊ शकतो. दुर्दैवाने असंख्य ग्राहकांना याविषयाची माहिती नाही. प्रसारा अभावी या योजनेपासून ग्राहक वंचित राहात आला आहे.

  शहरात 1 लाख 50 हजार गॅस सिलिंडरधारक आहते. या सर्व ग्राहकांना संबंधित विम्याविषयी गॅस एजन्सीने माहिती दिली पाहिजे. मात्र, ती दिली जात नाही. त्यामुळे ग्राहकाला विमा योजनेपासून वंचित राहावे लागते. संबंधित गॅस एजन्सीने विमा योजनेसंदर्भात जाहीर फलक लावला जात नाही, त्यामुळे विम्यासंदर्भातील माहिती विषयी गॅस सिलिंडर ग्राहक अनभिज्ञ राहतो.

  तपासणी महत्त्वाची

  एजन्सीकडून दर दोन वर्षानंतर सिलिंडर, शेगडी आणि नळीची तपासणी केली जाते. अपघात उद्भवू नये याकरिताच ही तपासणी असते, परंतू अनेक ग्राहक त्याकडे पाठ फिरवताना दिसतात. मात्र, कधी तपासणी केली याची ऑनलाईन नोंद होऊ लागली आहे. ज्यावेळी सिलिंडरचा स्फोट होण्याचे प्रकार उद्भवतात, त्यावेळी विम्याचा लाभ देताना इन्स्पेक्शन रिपोर्ट तपासला जातो. आणि त्यावेळी जर कंपनीकडे दावा केलेला नसेल तर त्याचा काहीच लाभ मिळू शकत नाही. ग्राहकांनी सिलिंडर घेतानाच विम्यविषयची चौकशी संबंधित एजन्सीधारकाकडे करावी, असे मत एजन्सीजच्य संचालकांनी व्यक्त केले.

  दावा करण्यासाठी हे आवश्यक आहे

  गॅस जोडणी कायदेशीर असावी
  गॅस एजन्सीकडून मिळालेल्या गॅस पाइपचा उपयोग व्हावा
  आयएसआय शेगडीचा वापर करावा
  बेजबाबदारीने उपयोग केल्यास नुकसानभरपाई मिळणार नाही
  गॅसचा उपयोग करण्याच्या जागेवर उघड्या वीज तारा नको
  ज्या ठिकाणी गॅसचा उपयोग केला जातो ती जागा मोकळी हवी

Trending