आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dispute Between Nationalist Congress Party Leader In Akola

अकोला ‘राष्ट्रवादी’च्या पदाधिकार्‍यांमध्ये हाणामारी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- राष्ट्रवादी विद्यार्थी कॉँग्रेसच्या आजी-माजी शहराध्यक्षांमध्ये अन्न व पुरवठामंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीत बसण्याच्या कारणावरून हाणामारी झाली. ही घटना शनिवारी दुपारी शासकीय विश्रामगृहात घडली.

अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीमध्ये शहराध्यक्ष अजय तापडिया बसत असताना तिथे विद्यार्थी कॉँग्रेसचे शहराध्यक्ष गौरव शर्मा बसले होते. त्यामुळे शर्मा व माजी शहराध्यक्ष बुढन गाडेकर यांच्यात बाचाबाची होऊन हाणामारी झाली. या वेळी उपस्थित असलेल्या पदाधिकार्‍यांनी वेळीच हस्तक्षेप करून या घटनेवर पडदा टाकला. या प्रकारामुळे राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये अंतर्गंत कलह असल्याचे सिद्ध झाले आहे.