Home | Maharashtra | Vidarva | Akola | enjoy the flavors of ice creams in all season

आइस्क्रीम 'एव्हरग्रीन, 'व्‍हाट इज यूवर फेवरेट फ्लेवर?

प्रतिनिधी | Update - Jul 21, 2013, 10:41 AM IST

रविवारी राष्‍ट्रीय आईसक्रीम डे आहे. आजकाल सर्वच ऋतूंमध्ये आइस्क्रीम आवडीने खातात.

 • enjoy the flavors of ice creams in all season

  उन्हाळय़ात उन्हाच्या काहिलीपासून सुटका होण्यासाठी आइस्क्रीमच्या गोडव्याचा आस्वाद घेण्याचा ट्रेंड आता बदलला असून, आइस्क्रीम 'एव्हरग्रीन' पदार्थ झाला आहे. रविवारी असलेल्या राष्ट्रीय आइस्क्रीम दिनानिमित्त शहरातील आइस्क्रीम पार्लरचा आढावा घेतला असता, अकोल्यात सर्वच ऋतूंमध्ये आइस्क्रीमला चांगली मागणी असल्याचे आढळून आले.

  कधीकाळी आइस्क्रीमला उन्हाळ्यात मागणी होती. एक गोड पदार्थ म्हणून आता आइस्क्रीमला मागणी वाढली आहे. आइस्क्रीमच्या फ्लेवरची युवकांमध्ये प्रचंड 'क्रेझ' आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत अकोल्यासारख्या मध्यम शहरातही असंख्य आइस्क्रीम पार्लर उघडले आहेत. यामध्ये शहरातील युवक-युवतींची प्रचंड झुंबड असते. वेगवेगळ्या आठ प्रकारच्या कंपन्यांच्या आइस्क्रीमला शहरात सर्वाधिक मागणी आहे. कप आणि फॅमिली पॅकची ऑक्टोबर ते जूनपर्यंत प्रचंड विक्री होते. साधारणत: दहापासून ते 300 रुपयांपर्यंत विविध प्रकारचे आइस्क्रीम अकोल्यात मिळतात. अकोल्यात आता आहे.

  'फेव्हरेट' 'फ्लेवर'
  अकोल्यात बाराही महिने आइस्क्रीमची विक्री होत असून, व्हेनिला, चॉकलेट, पिस्ता, बटरस्कॉच, मँगो, पायनापल, कसाटा, केशर पिस्ता, अंजीर, बदाम आदी फ्लेवर आइस्क्रीमप्रेमींचे फेव्हरेट आहे.

  नवीन 'फ्लेवर'ची क्रेझ
  आइस्क्रीमच्या पारंपरिक फ्लेवरसह ब्लॅक करंट, अल्फान्टो मँगो, जिलेबी, अफगाण ड्रायफ्रूट, राजवाडा कुल्फी, ब्लॅक फॉरेस्ट, राजभोग कुकलिंग क्रीम, फूट्र कॉकटेल आदी नवीन फ्लेवरचीही क्रेझ आहे.

  गोड पदार्थ म्हणून मान्यता
  जेवणाचा शेवट गोड पदार्थाने केला जातो. पूर्वी जेवण झाल्यावर तोंड गोड करण्यासाठी पारंपरिक पदार्थांचा आस्वाद घेतला जात होता. आता गोड पदार्थ म्हणून आइस्क्रीमला सर्वाधिक पसंती दिली जात आहे.

Trending