Home | Maharashtra | Vidarva | Akola | fake cbi team not paid toll in akola

टोल नाका शुल्कही तोतयांनी ‘टोलवले’

प्रतिनिधी | Update - Jul 17, 2013, 09:20 AM IST

अकोला येथील सराफा व्यवसायी प्रशांत झांबड यांच्या घरावर 2 जुलै रोजी बनावट छापा टाकला होता. हे तोतया ‘सीबीआय’ पथक मुंबईचे होते.

  • fake cbi team not paid toll in akola

    अकोला- तोतया ‘सीबीआय’ पथकाने टोल नाक्यांवर प्रवेश शुल्क न भरण्यासाठी बनावट ओळखपत्राचा वापर केल्याची बाब उघडकीस आली आहे. ‘टोल नाक्यांवरील कर्मचारीही ‘सीबीआय’चे ओळखपत्र पाहून शुल्क न घेताच गाडीचा मार्ग मोकळा करीत होते,’ अशी माहिती पोलिस कोठडीत असलेल्या चालकाने पोलिसांना दिली आहे. या चालकाची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

    अकोला येथील सराफा व्यवसायी प्रशांत झांबड यांच्या घरावर 2 जुलै रोजी बनावट छापा टाकला होता. हे तोतया ‘सीबीआय’ पथक मुंबईचे होते. या पथकाने एमएच-04-एफआर-260 या क्रमांकाची झायलो मुंबईतील चेंबूर येथील एका टॅक्सी सेंटरवरून आरक्षित केली. चेंबूर परिसरातील एका नाक्याजवळ ही गाडी उभी करावी, असे तोतया ‘सीबीआय’ पथकाने टॅक्सी एजंटला सांगितले. मात्र, निश्चित स्थळापेक्षा एक किलोमीटर आधीच या पथकाला आरक्षित गाडीचा क्रमांक दिसल्याने त्यांनी गाडीला थांबवले. टॅक्सी सेंटरच्या एजंटने चालक मोहंमद हारुण शेख कुद्दुस याला आधीच गाडीत ‘सीबीआय’चे अधिकारी असल्याचे सांगितले होते. त्यामुळे तोही अधिकार्‍यांशी नम्रतेनेच वागत होता, असेही त्याने पोलिसांना सांगितले.

    तोतया ‘सीबीआय’ पथक रात्री मुंबईहून अकोल्याकडे निघाले. चालकाच्या बाजूला मकरंद नामक अधिकारी बसला होता. मधल्या सीटवर पथकातील दोन महिला होत्या.

Trending