आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांसाठी कर्ज पुनर्गठन ठरतेय निव्वळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिग्रस - शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्याचा निर्णय घेतलेला असला, तरी त्यातून यवतमाळातील शेतकऱ्यांच्या पदरी काही पडेल, याबाबतच साशंकताच अाहे. कारण जिल्ह्यातील साडेचार लाख शेतकऱ्यांपैकी तब्बल लाख १७ शेतकरी हे मागील पाच वर्षांपासून थकबाकीदार अाहेत.
याबाबत प्रशासन म्हणतेय की, कर्जाचे पुनर्गठन हे मागील वर्षीच्या कर्जदार शेतकऱ्यांचेच हाेईल. त्यापूर्वीच्या नाही. त्यामुळे शासनाकडून पुनर्गठनासाठी मंजूर वाटप करण्यात येणाऱ्या रकमेतही फरक असून, अद्याप तब्बल ६० टक्के रक्कम अप्राप्त असल्याने अनेक शेतकरी वंचित राहण्याचीच शक्यता निर्माण झाली अाहे.
शासनाने कर्ज पुनर्गठनासाठी यवतमाळ जिल्ह्यासाठी २९५.२९ काेटी रुपये मंजूर केलेले अाहेत. त्यांपैकी केवळ १२२.८० काेटी रुपयांचेच वाटप करण्यात अालेले अाहे. म्हणजे, मंजूर रकमेपैकी ४० टक्केच रक्कम प्राप्त झालेली अाहे. उर्वरित ६० टक्के रक्कम अद्याप यायची अाहे. त्यातून केवळ ३५ टक्केच शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यात अालेले अाहे. एकट्या यवतमाळ जिल्ह्याचीच ही परिस्थिती नाही, तर राज्यातील नाशिक, पुणे, नागपूर, अाैरंगाबाद अमरावती या पाच विभागांतही अशीच परिस्थिती अाहे. तेथेही मंजूर रकमेपैकी वाटप रकमेत माेठाच फरक अाहे.

यवतमाळ जिल्ह्यातील लाख ५० हजार शेतकऱ्यांपैकी लाख १७ शेतकऱ्यांकडे तब्बल ४९३.९१ काेटी थकित अाहेत. २००९-१० पासूनची ही रक्कम थकित अाहे. उर्वरित शेतकऱ्यांकडेही दाेन वर्षांपेक्षाच्या अधिक वर्षांपासून रक्कम थकित असण्याची शक्यता अाहे. त्यातून शासनाने जे कर्ज पुनर्गठनासाठी धाेरण ठरवलेले अाहे, त्यामध्ये मागील वर्षीचे कर्ज असणाऱ्यांच्याच कर्जाचे पुनर्गठन समाविष्ट करण्यात अालेले अाहे. त्यापूर्वीच्या कर्जदारांच्या कर्जाचे पुनर्गठन हाेणार नाही, असे प्रशासकीय सूत्र सांगतात. त्यामुळे जिल्ह्यातील हजाराे शेतकरी कर्ज पुनर्गठनापासून वंचित राहणार अाहेत. त्यामुळे कर्ज पुनर्गठन योजना मदतीचा फक्त आभास असल्याची भावना शेतकरी बोलून दाखवत आहेत. जिल्हा सहकारी बँकेने तर अजूनपर्यंत कर्जवाटपही सुरू केलेले नाही.
शासनानेशेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्याचा निर्णय घेतलेला असला, तरी त्यातून यवतमाळातील शेतकऱ्यांच्या पदरी काही पडेल, याबाबतच साशंकताच अाहे. कारण जिल्ह्यातील साडेचार लाख शेतकऱ्यांपैकी तब्बल लाख १७ शेतकरी हे मागील पाच वर्षांपासून थकबाकीदार अाहेत. याबाबत प्रशासन म्हणतेय की, कर्जाचे पुनर्गठन हे मागील वर्षीच्या कर्जदार शेतकऱ्यांचेच हाेईल. त्यापूर्वीच्या नाही. त्यामुळे शासनाकडून पुनर्गठनासाठी मंजूर वाटप करण्यात येणाऱ्या रकमेतही फरक असून, अद्याप तब्बल ६० टक्के रक्कम अप्राप्त असल्याने अनेक शेतकरी वंचित राहण्याचीच शक्यता निर्माण झाली अाहे.
नाेंद असणाऱ्यांना लाभ
मागीलवर्षी ज्यांनी कर्ज घेतले हाेते, अशा चालू खातेदारांच्याच कर्जाचे पुनर्गठन हाेणार अाहे. त्यांना गतवर्षीचे यंदाचे मिळून कर्ज फेडावे लागणार अाहे. याशिवाय अात्महत्येची नाेंद अशांना लाभ मिळणार अाहे. नितीनदेवरे, तहसीलदार, दिग्रस.
नव्याने कर्ज देणे अावश्यक
ज्याप्रमाणे हाती आलेलं पीक विकून काही शेतकऱ्यांनी आपली कर्जप्रकरणे दरवर्षी नवी-जुनी करून कसे तरी काम भागवले. पण, आम्हाला तर तेवढंही पिकलं नाही. मग, कर्ज कसे फेडणार, उलट दरवर्षी कर्जावर व्याजाचा बोजा वाढतच आहे. येत्या काळात बेभाव शेती विकण्याशिवाय अन्य मार्ग उरणार नाही. म्हणून थकित कर्जदार शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यासह नव्याने कर्ज देणेही आवश्यक आहे. गोपीचंदराठोड, थकित कर्जदार शेतकरी, दिग्रस
७/१२ काेरा करावा
थकित कर्जदारांनाच खऱ्या अर्थाने मदतीची गरज अाहे. पण, त्यांनाच कर्ज मिळत नाही, हे दुर्दैवी अाहे. त्यांचा ७-१२ काेरा करून नव्याने कर्ज देण्याची गरज अाहे. देवेंद्रराऊत, जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना
उर्वरित रक्कम मिळावी
पाचवर्षांच्या कृषी आढावा अहवालावरून, सतत तीन वर्षांपासून ५० टक्क्यांपेक्षा कमी आणेवारी असलेल्या भागातील शेतकऱ्यांच्या कर्जावरील व्याजमाफी स्वरूपात ३९४ कोटी रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिसेंबर २०१४ च्या नागपूर हिवाळी अधिवेशनात केली होती. त्या घोषणेची अंमलबजावणी अद्याप नाही. सन २०१४ मधील नैसर्गिक आपत्तीने बाधित राज्यातील २६ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना जाहीर ४८०३.०९ कोटींच्या मदतीपैकी ४० टक्केच मदत प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली, पैकी ६० टक्के म्हणजे, २८०३.०९ काेटी रक्कम अजूनही अप्राप्त आहे. ती रक्कम लवकरात लवकर मिळणे गरजेचे आहे.

विभाग मंजूर वाटप रक्कम
नाशिक ९२८.६१ काेटी ६८६.६२ काेटी
पुणे १६.४७ काेटी ७.५० काेटी
अाैरंगाबाद २०३२.६६ काेटी ८४५.५५ काेटी
अमरावती १२०४.०३ काेटी ५००.९३ काेटी
नागपूर ६२१.३२ काेटी २५९.४० काेटी
बातम्या आणखी आहेत...