Home | Maharashtra | Vidarva | Akola | food park issue akola

फूड पार्कचे ‘दिवास्वप्न’

प्रबोध देशपांडे | Update - Jul 20, 2013, 10:06 AM IST

अकोल्यात फूड व कॉटन पार्क होण्यासाठीचा प्रस्ताव राजीव गांधी मिशन व विज्ञान तंत्रज्ञान संस्थेकडे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सादर केला आहे.

 • food park issue akola

  अकोला - अकोल्यात फूड व कॉटन पार्क होण्यासाठीचा प्रस्ताव राजीव गांधी मिशन व विज्ञान तंत्रज्ञान संस्थेकडे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सादर केला आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रस्ताव धूळखात पडला आहे.

  अकोल्यात फूड व कॉटन पार्क झाल्यास थेट प्रक्रिया केलेला माल बाहेर पडणार होता. मात्र, फूड व कॉटन पार्कचे अकोलेकरांचे दिवास्वप्नच राहणार की काय, अशी स्थिती सध्या आहे. अकोल्यासह पश्चिम विदर्भात मोठय़ा प्रमाणात फूड व कॉटन उत्पादन होत असले तरी या ठिकाणी प्रक्रिया उद्योग नसल्याने हा माल बाहेर पाठवावा लागतो. केंद्र शासनाने राज्यात सहा ठिकाणी टेक्सटाइल्स पार्क मंजूर केले आहेत. अकोला जिल्ह्यात कोणताही मोठा सार्वजनिक, खासगी उद्योग नसतानाही या टेक्सटाइल्स पार्कला अकोल्यात मंजुरात देण्यात आली नाही.

  फूड व कॉटन पार्क उभारण्यासाठी पीडीकेव्हीकडे दोन वर्षांपूर्वी प्रस्ताव मागण्यात आला होता. राज्य शासनाचा उपक्रम असलेल्या राजीव गांधी मिशन व विज्ञान तंत्रज्ञान संस्थेला तत्कालीन कुलगुरू डॉ. व्यंकटराव मायंदे यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शेती क्षेत्रावर फूड पार्क व इतर पार्क व्हावे, यासाठीची संकल्पना मांडली होती. यावर राजीव गांधी मिशन व विज्ञान तंत्रज्ञान संस्थेसोबत बैठकही झाली. या संस्था संपुर्ण आर्थिक पाठबळ या पार्कला करणार होत्या. या पार्कला संस्थांकडून तत्त्वत: मान्यताही मिळाली. 100 ते 120 कोटी रुपये यासाठी खर्च अपेक्षित होता. त्यानंतर माशी कुठे शिंकली हा प्रo्न आहे. गेल्या दोन वर्षांत हा प्रस्ताव धूळखात पडला आहे.

  काय आहे फूड पार्क?
  शेतकर्‍यांना उत्पादित माल, अन्नधान्य फूड व कॉटन प्रक्रिया करण्यासाठी विदर्भाबाहेर न्यावा लागतो. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात कॉटन पार्क झाल्यास तो माल विद्यापीठात येऊन प्रक्रियेपासून सर्वच प्रक्रिया करण्यात येईल.

Trending