आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यवतमाळ जिल्ह्यात चार शेतक-यांच्या आत्महत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ- यवतमाळ जिल्ह्यामध्ये मागील 24 तासांमध्ये चार शेतक-यांनी आत्महत्या केल्याचे समाेर अाले अाहे. दरम्यान, आता तरी सरकारने दुष्काळग्रस्त शेतक-यांना भरीव मदत करून दिलासा द्यावा, अशी मागणी विदर्भ जनआंदोलन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी, मोहन जाधव यांनी केली आहे. कळंब तालुक्यातील देवनालाचे तुलसीराम राठोड, सोनेगाव येथील देवराव भागवत, घाटंजी तालुक्यातील बोदडीचे बन्सी राठोड तसेच केळापूर तालुक्यातील मोहदा येथील प्रकाश कुतरमारे अशी मृतांची नावे अाहेत. या शेतकऱ्यांनी विष घेऊन आत्महत्या केली.