आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलयुक्त’च्या सव्वा कोटींच्या कामांना ‘ब्रेक’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुसद जलयुक्तशिवार अभियानांतर्गत राबवण्यात आलेल्या विकास कामांची अतांत्रिक कंत्राटदारांनी वाट लावल्याने नुकत्याच झालेल्या दमदार पावसाने जलयुक्त शिवार योजना पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे. याशिवाय १.२५ कोटी रुपयांच्या कामालाही पावसामुळे ‘ब्रेक’ लागला आहे.
आपले गाव, शिवार जलयुक्त जलसमृद्ध करण्यासाठी तसेच दुष्काळग्रस्त शेतमजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या हेतूने राबवण्यात आलेल्या शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेचा बोजवारा उडाला आहे. राजकिय पुढाऱ्यांच्या मर्जीतील अतांत्रिक कंत्राटदारांना कामाचे कंत्राट दिल्याने आणि त्यांच्याकडून दर्जायुक्त कामाकडे दुर्लक्ष झाल्याने पावसाचे पाणी थांबवण्याचा उद्देशच असफल झाल्याचा सूर उमटू लागला आहे. नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने नदी, नाला सरळीकरण, बंधारे हे पूर्णतः वाहुन गेले आहेत. वरिष्ट पातळीवरील अधिकाऱ्यांनी राजकिय दबावाला झुगारून संबंधित कंत्राटदारावर अंकुश ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. सदरील कामे जेसीबी मशीनच्या सहायाने झाली असल्याने मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे.

कंत्राटदारांनीलावली विकास कामांची वाट
जलयुक्तशिवार योजनेतील कामे ही निकृष्ट दर्जाची आणि पावसाळयापूर्वी झाली आहेत. पावसाळयातच अनेक कामे करण्यासाठी अधिकारी कंत्राटदारांनी कंबर कसली होती. आता पावसाने जोर काम ठेवल्यामुळे पावसाळयात १.२५ कोटींच्या कामाला ब्रेक लागला आहे.
कमिशनसंस्कृतीचं चांगभलं
कामाचेकंत्राट मिळवण्यासाठी तालुका कृषी विभागाला जिल्हा परिषदेला कंत्राटदारांनी साकडे घालून कंत्राट मिळवला होता. ज्या कंत्राटदारांनी कामे केली आहेत त्यामध्ये निकृष्टताच आढळून येत असल्याचा आरोप ग्रामस्थ शेतकऱ्यांनी केला आहे. सदर कामात कंत्राट मिळवण्यासाठी कमिशन देण्याची संस्कृती असल्याचे सांगितले जाते. सनाचे निकष वेशीला जलयुक्त शिवार अभियानचे काम मजुरांच्या हातातून काम करून घेण्याचे निकष आहेत. परंतु तसे होता मशीनच्या साह्याने कामे केली जात आहेत.

३५ कोटी अजूनही आलेच नाहीत
यंदाजलयुक्त शिवार योजना राबवण्यासाठी तालुका कृषी विभागाकडून जिल्हा परिषदेकडे जिल्हा परिषदेने शासनाकडे ३० ते ३५ कोटींचा प्रस्ताव पाठवला होता. त्या प्रस्तावाला शासनाने मंजुरातही दिली. मात्र, यंदा हा निधी आला नसल्याने जलयुक्त शिवारांची अनेक कामे अडकली आहेत.
मागील वर्षीचा निधी वापरला
जलयुक्तशिवार योजनांची विविध कामे करण्यासाठी २.२५ कोटी रुपये खर्च होणार होते. त्यापैकी कोटी रुपयांची कामे तालुक्यात झाली आहेत. १.२५ कोटींची कामे पावसाळ्यामुळे थांबली आहेत. हा निधी मागील वर्षीचा वापरात घेतला असून यंदाचा ३० ते ३५ कोटींच्या प्रस्तावाला शासनाने मंजूर केला आहे तो निधी तालुका कृषी कार्यालयाला मिळालेला नाही.'' के.एस. राठोड, तालुका कृषी अधिकारी, पुसद