आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra: Ex office Bearer Of Panchayat Samiti Gunned Down By Naxals

गडचिरोली : माजी पंचायत समिती उपाध्यक्षाला नक्षल्यांनी घातल्या गोळ्या, जागीच ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गडचिरोली - जिलह्यातील एका माजी पंचायत समिती अध्यक्षाला नक्षलवाद्यांनी गोळ्या घालून ठार केले आहे. घटनेनंतर पोलिसांनी याबाबत माहिती दिली. घिसू मिट्टामी असे या माजी अध्यक्षाचे नाव आहे. ऐटापल्ली गावामध्ये राहणार्या घिसू यांच्या घरातस घुसून नक्षल्यांनी त्यांच्यावर गोळ्या झा‍डल्या. मट्टामी यांच्या पत्नी ललिता या सध्या पंचायत समितीच्या अध्यक्ष आहेत. त्या मात्र या हल्ल्यातून थोडक्यात बचावल्या.
मंगळवारी रात्री घिसू त्यांच्या पत्नीसह घरामध्ये बसेलेल होते. त्यावेळी सुमारे तीन ते चार शस्त्रधारी नक्षलवादी त्यांच्या घरामध्ये घुसले. या सगळ्यांनी त्यांना गोळ्या घातल्याने ते जागीच ठार झाले असे पोलिस म्हणाले. या घटनेनंतर नक्षल्यांनी लगेचच तेथून पळ काढला. गंभीर जखमी असलेल्या मट्टामी यांना ऐटापल्लीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू केली अशून तपासाचा वेगही वाढवला आहे.
या महिनाभरात नक्षलवाद्यांनी गडचिरोलीत केलेला हा तिसरा मोठा हल्ला आहे. याआधी 25 मे रोजी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्याची अहेरी तालुक्यातील निमलगुडा गावामध्ये हत्या करण्यात आली होती. तर त्यापूर्वी 11 मे रोजी सात पोलिस अधिका-यांची भूसुरुंगाच्या मदतीने हत्या करण्यात आली होती. चामोर्शी तालुक्यातील मुरमुरी गावात हा स्फोट घडवण्यात आला होता.