आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"हॉकर झोनच्या कामाला गती द्या'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- हॉकर्सझोन नसल्यामुळे फेरीवाल्यांची होणारी परवड, अतिक्रमण हटवताना वारंवार होणारे वाद-प्रतिवाद आणि या सर्वांमुळे बिघडलेले सामािजक आरोग्य या पार्श्वभूमीवर आमदार डॉ. सुनील देशमुख यांनी रविवारी (दि. 21 ) तिन्ही आयुक्तांची बैठक घेतली. हॉकर्स झोनच्या कामाला गती द्या, अशा सूचना या वेळी देण्यात आल्या.
विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला स्वत: विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर, महापालिकेचे आयुक्त अरुण डोंगरे पोलिस आयुक्त डॉ. सुरेश मेकला त्यांचे अधिनस्थ अधिकारी उपस्थित होते. केंद्र शासनाने फार पूर्वीच ‘नॅशनल हॉकर पॉलिसी’ तयार केली आहे. हॉकर्स आणि सामान्य नागरिक या दोन्ही घटकांचे हित जपणारे हे धोरण असून, सर्वोच्च न्यायालयानेही या धोरणाची अंमलबजावणी व्हावी, असे निर्देश महापालिकांना दिले आहेत. तोच धागा पकडून आमदार डॉ. सुनील देशमुख यांनी रविवारी बैठक घेतली.
हॉकर्स झोन नसल्यामुळे शहरात वारंवार पोलिस आणि फेरीवाल्यांमध्ये वाद होतात. महापािलकेच्या बाजार परवाना विभागातर्फे केल्या जाणाऱ्या कारवाईचाही फेरीवाल्यांना अनेकदा सामना करावा लागतो. त्यामुळे या घटकासाठी कायमस्वरूपी व्यवस्था असावी, असे आमदार महोदयांचे म्हणणे आहे.

चर्चेदरम्यान महापािलकेतर्फे सुरू असलेले प्रयत्न आमदार महोदयांच्या समोर मांडण्यात आले. त्याचवेळी पोलिस विभागानेही आपला अहवाल मांडला. फेरीवाल्यांचे अतिक्रमण हटवण्यासाठी पोलिसांना द्यावी लागणारी रक्कम आणि महापािलकेची आर्थिक स्थिती यांवरही बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे.
मनपाने सुरू केले कार्य
नॅशनलहॉकर्स पॉलिसी आणि सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश यांमुळे महापािलकेने आधीच या मुद्द्यावर काम सुरू केले आहे. फेरीवाल्यांची ओळख पटावी म्हणून त्यांना रीतसर ओळखपत्र आणि मालविक्रीसाठी ठरावीक जागा देण्याबाबतच्या हालचाली सुरू आहेत. हॉकर्स युनियनचे पदाधिकारी, पोलिस अधिकारी आणि मनपा प्रशासनादरम्यान अलीकडेच एक बैठकही घेतली गेली.