Home | Maharashtra | Vidarva | Akola | municipal corporation work from hutatma smarak hall in akola

हुतात्मा स्मारक सभागृहात मनपा आयुक्तांनी थाटले कार्यालय

शंतनू राऊत | Update - Jul 20, 2013, 10:09 AM IST

महापालिका आयुक्तांचा कारभार आता महापालिकेतून नव्हे, तर थेट नेहरू पार्क चौकात असलेल्या हुतात्मा स्मारक सभागृहातून पाहला जात आहे.

 • municipal corporation work from hutatma smarak hall in akola

  अकोला - महापालिका आयुक्तांचा कारभार आता महापालिकेतून नव्हे, तर थेट नेहरू पार्क चौकात असलेल्या हुतात्मा स्मारक सभागृहातून पाहिला जात आहे. हा प्रकार महापौर व उपमहापौर यांना अवगत आहे. मात्र, त्यांनी या प्रकाराबाबत कानावर हात ठेवले आहेत.

  महापालिका आयुक्त दीपक चौधरी यांना भेटण्यासाठी नागरिक, नगरसेवक आणि काही सामाजिक संघटनांचे पदाधिकारी महापालिकेत येतात, परंतु त्यांचे दर्शन नागरिकांना होत नाही. मागील काही दिवसांपासूनचे हे वास्तव आहे. महापालिकेत सर्व सोयी-सुविधायुक्त कार्यालय असताना आयुक्तांनी हुतात्मा स्मारक सभागृहात कार्यालय थाटले आहे. शहर विकासाच्या काही फायली असल्यास त्यावर स्वाक्षरी करण्यासाठी अधिकार्‍यांना तेथे बोलावले जाते. तेथूनच मनपा आयुक्तपदाचा कारभार नियमित पाहण्यात येतो. नगरसेवकसुद्धा काही काम असल्यास तेथे जातात. मात्र, आयुक्तांच्या मनमानी कारभाराविरोधात कोणीही शासनाकडे तक्रार करण्यास पुढे येत नाही.

  जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आयुक्त
  शहरातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आयुक्तांनी महापालिकेच्या कार्यालयात बसणे आवश्यक आहे. हल्ली आयुक्त दीपक चौधरी कार्यालयात कमी आणि हुतात्मा स्मारक सभागृहात जास्त वेळ बसतात, हा प्रकार योग्य नाही. प्रशासनाच्या नियमानुसार काम करणे गरजेचे आहे. हरीश आलिमचंदाणी, विरोधी पक्षनेते मनपा, अकोला.

  आयुक्त जबाबदार अधिकारी
  आयुक्त एक जबाबदार अधिकारी आहेत. त्यांनी मनपा परिसरातील कार्यालयात बसणे गरजेचे आहे. यासंदर्भात आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. रफिक सिद्दीकी, उपमहापौर, मनपा अकोला.

  शहर हितासाठीच निर्णय
  महापालिकेत होणार्‍या उठसूठ आंदोलनामुळे आणि विनाकारण तक्रारीमुळे प्रशासकीय कामकाज विस्कळीत होते. काही महत्त्वाच्या फाइल असतात. काही शहराच्या हिताच्या कामासाठी हुतात्मा स्मारकातील सभागृहात काही तास बसून मी महापालिकेचे कामकाज पाहत आहे. दीपक चौधरी, आयुक्त, महापालिका, अकोला

Trending