आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अकोला- केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनेंतर्गत दोन हजार कोटी रुपयांच्या आर्थिक गुंतवणुकीतून 611 गोदाम उभारणार असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री अनिल देशमुख यांनी येथे शनिवारी पत्रकार परिषदेमध्ये दिली. या गोदामांमध्ये 13.5 लाख टन धान्याची साठवणूक करणे शक्य होणार आहे.
राज्यात 14 कोटी 17 लाखांची 12 हजार टन क्षमतेच्या 20 गोदामांची कामे पूर्ण झाली. सुमारे 68 हजार टन साठवणूक क्षमता असलेल्या 80 कोटींच्या 54 गोदामांची कामे प्रगतिपथावर असल्याचे नामदार अनिल देशमुख यांनी सांगितले.
संगणकीकृत व छायाचित्र असलेल्या शिधापत्रिका
राज्यातील शिधापत्रिकांच्या डाटा एण्ट्रीचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. लाभार्थ्यांना लवकरच बार कोड व छायाचित्र असलेल्या नवीन संगणकीकृत शिधापत्रिका वितरित केल्या जाणार आहे.
स्वतंत्र संकेतस्थळ
सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये पारदर्शकता आणण्याच्या दृष्टिकोनातून स्वतंत्र संकेतस्थळ कार्यान्वित करण्यात आले आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेसंबंधी काही तक्रारी निर्माण झाल्यास जनतेला ‘डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाफूड डॉट जीओव्ही डॉट इन’ या संकेतस्थळावर ऑनलाइन तक्रार नोंदवता येईल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.