गरीब विद्यार्थी मिळेनात! / गरीब विद्यार्थी मिळेनात!

प्रबोध देशपांडे

Jul 20,2013 10:01:00 AM IST

अकोला - बालकांना मोफत शिक्षण कायदा 2009 नुसार, खासगी अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमध्ये गरीब व अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी 25 टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत़ यानुसार वर्ष 2013-14 साठी 162 शाळांमध्ये पहिली व नर्सरी मिळून 1767 विद्यार्थ्यांचे उद्दिष्ट होत़े त्यांपैकी 1319 विद्यार्थ्यांना या राखीव कोट्यातून महागड्या शाळेत प्रवेशाची संधी मिळाली आह़े अद्यापही 448 जागा रिक्त असून, शाळांना प्रवेशासाठी गरीब विद्यार्थी भेट नसल्याचे शाळाचालकांचे म्हणणे आहे.

शिक्षणापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही, याची काळजी शिक्षण विभागाकडून घेतली जात आह़े यात शहरातील अनेक मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात आल़े याला जोड देत आर्थिक परिस्थिती गरीब असलेल्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजेच वंचित गट व दुर्बल घटकातील बालकांना प्रत्येक शाळेने त्यांच्या क्षमतेच्या 25 टक्के प्रवेश देणे मागील वर्षापासून बंधनकारक केलेले आह़े. गतवर्षी याची अंमलबजावणी उशिरा झाल्याने शहरातील विद्यार्थ्यांना याचा फायदा घेता आला नाही़. यामागे पालकांना यासंदर्भात माहिती नसल्याने 25 टक्के कोट्यातील प्रवेश पूर्ण झाले नाहीत, हेही कारण यामागे आह़े ही विविध कारणे मागे पाहता यावर्षी या कोट्यासंदर्भात येणार्‍या अडचणी लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने बदल केला़.

25 टक्के प्रवेशाची जबाबदारी पूर्णपणे शाळांवर देण्यात आली़. या कोट्यातील प्रवेश देण्यासंदर्भात परिसरात लाउड स्पीकर, बॅनर्स, दवंडी देऊन माहिती देण्याचे अनिवार्य करण्यात आले आह़े. यानुसार खासगी 162 शाळांनी यावर्षी शिक्षण विभागाच्या आदेशाचे पालन करून होतकरू, गरीब अशा मुलांची निवड करून आरक्षणाचा फायदा करून दिला आह़े. मात्र, आता या प्रवेशाची मुदत संपली असली तरी, ही 448 जागा अकोला जिल्ह्यात रिक्त आहेत. या जागांवर विद्यार्थी मिळत नसल्याचे शाळाचालकांचे म्हणणे आहे. शाळेत इतर प्रवेश हे 25 टक्के कोट्यात दाखवून गरजू विद्यार्थ्यांना संधीपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न एखाद्या शाळेने केला असेल, शासनाकडून मिळणारे अनुदान लाटण्याचे कार्य केले जाणार असल्यास अशा शाळांवर शिक्षण विभागाकडून कारवाई करण्याचा फार्म्युलाही वापरण्यात आला़

शिक्षण विभागाची नजर!
संबंधित शाळांनी वंचित गट व दुर्बल घटकातील पालकांना 25 टक्केअंतर्गत कोट्यातून प्रवेश दिला आहे का, यासाठी विद्यार्थ्यांची यादी शिक्षण विभाग घेत आहे. आढावा घेण्यात आला. संबंधित शाळांना मिळणारी मदतही या यादीनुसार असणार आह़े

रिक्त पदांसाठी आढावा
अकोला जिल्ह्यातील रिक्त 448 पदे भरण्यासाठी पुन्हा 2 व 3 ऑगस्टला बैठक घेऊन आढावा घेण्यात येणार आहे. त्या वेळी या रिक्त जागांसंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे.

शहरातील 162 शाळांनी केले नियमाचे पालन
162 शाळेत 25 टक्के कोट्यातून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची जबाबदारी संबंधित शाळांवर सोपवण्यात आलेली आह़े 162 शाळांनी या नियमाचे पालन केले आह़े यासाठी विविध माध्यमांचा वापर करणे अनिवार्य केले होत़े यात प्रचार साधनांचा वापर कण्यात आला़ सर्व शाळांतील 25 टक्के प्रवेश पूर्ण करण्यात येणार आहे. अशोक सोनवणे, शिक्षणाधिकारी, अकोला.

X
COMMENT