Home | Maharashtra | Vidarva | Akola | rain in akola

अकोला जिल्ह्यात 24 तासांत 8 मि.मी. पावसाची नोंद

प्रतिनिधी | Update - Jul 20, 2013, 10:11 AM IST

मागील 24 तासांत 8.00 मि. मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. सर्वाधिक पावसाची नोंद अकोला, मूर्तिजापूर तालुक्यात करण्यात आली,

  • rain in akola

    अकोला - मागील 24 तासांत 8.00 मि. मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. सर्वाधिक पावसाची नोंद अकोला, मूर्तिजापूर तालुक्यात करण्यात आली, तर सर्वात कमी पावसाची नोंद अकोट, बाळापूर तालुक्यात करण्यात आली.

    जिल्हय़ातील वान व काटेपूर्णा जलसाठय़ामध्ये वाढ झाली आहे. अकोला तालुक्यात 2.00 मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. यासोबतच बार्शिटाकळी तालुक्यात 3.00 मि.मी., अकोट व बाळापूर तालुक्यात पाऊस निरंक आहे, तेल्हारा तालुक्यात 1.00 मि.मी., पातुर तालुक्यात 2.00 मि. मी., तर मूर्तिजापूर तालुक्यात 7.00 मि.मि. पावसाची नोंद करण्यात आली आहे. मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील जलसाठय़ामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. 1 जून ते 19 जुलैपर्यंत अकोला 7.50, बार्शिटाकळी 378. 40, अकोट 338. 04 , तेल्हारा 549. 10, बाळापूर 341 . 71, पातूर 528. 13 , मूर्तिजापूर 417 . 30 मि.मि. पाऊस झाला आहे.

    काटेपूर्णा प्रकल्प 75टक्के तर वान प्रकल्प 80.44 टक्के भरलेला आहे. जिल्ह्यात मागील 20 दिवसात एकूण 2930. 18 मि.मी. पाऊस पडला आहे.

Trending