आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंकजा मुंडे, तावडेंंना भाजपकडून क्लीन चिट; दानवेंकडून पाठराखण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - महिला व बालविकास विभागातील साहित्य खरेदीत पंकजा मुंडे यांनी कुठलाही भ्रष्टाचार केलेला नाही, तर बनावट पदवी प्रकरणात शिक्षणमंत्री विनोद तावडे हेही कुठल्याही पद्धतीने दोषी नाहीत, या शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी गुरुवारी या नेत्यांची पाठराखण केली.

दानवे म्हणाले, आघाडी सरकारच्या काळातील खरेदी प्रक्रियेप्रमाणेच ही खरेदी प्रक्रिया राबवली आहे. केंद्र सरकारचा निधी परत जाऊ नये यासाठी ई-निविदा न काढता दरपत्रक पद्धतीप्रमाणे खरेदीचा निर्णय झाला. मात्र, यात कुठेही भ्रष्टाचार झालेला नाही. भविष्यात सरकार ई-निविदा पद्धतीची अंमलबजावणी निश्चितपणे करेल, असेही ते म्हणाले.

विनोद तावडे कुठेही दोषी नाहीत. ज्या ज्ञानेश्वर विद्यापीठातून तावडे यांनी पदवी घेतली, त्याची मान्यता नंतर रद्द झाल्याचे सांगून यात तावडेंचा दोष काय? असा प्रश्न दानवेंनी उपस्थित केला. तावडे यांना त्यातून कुठलाही आर्थिक लाभ झालेला नाही, याकडे लक्ष वेधून विरोधी पक्षांकडे कुठलेही मुद्दे नसल्याने ते बेलगाम आरोप करीत सुटले आहेत, असा आरोपही दानवे यांनी केला.