आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Religion,Language Accept From School Living Certificate

‘टीसी’वरील धर्म व भाषेचा उल्लेख ग्राह्य धरण्याचा राज्‍य शासनाचा निर्णय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - धार्मिक, भाषिक अल्पसंख्यक दर्जाप्राप्त शासन अनुदानित तसेच कायम विना अनुदानित शैक्षणिक संस्थाव्दारा राबवण्यात येत असलेल्या अभ्यासक्रमात अल्पसंख्यक विद्यार्थ्यांना प्रवेश देताना धर्म व भाषेचा उल्लेख असलेला शाळेचा दाखला ग्राह्य धरण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. अल्पसंख्यक दर्जा प्रमाणपत्र शासनाकडून केला जाणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

शासन अनुदानित तसेच कायम विना अनुदानित शाळा, शैक्षणिक संस्था यांना विद्यार्थ्यांना प्रवेश देताना विद्यार्थ्यांच्या धर्म तसेच मातृभाषेविषयी उल्लेख करावा लागणार आहे. शाळांना शैक्षणिक संस्थांना संबंधित अल्पसंख्यक समाजाच्या संघटनेने किंवा धर्म प्रमुखाने दिलेले प्रमाणपत्र, संबंधित विद्यार्थी पालकांचे धर्म व मातृभाषेविषयीचे शपथपत्र पुरावा म्हणून ग्राह्य धरावा लागणार आहे. शाळा सोडल्याचा दाखला, प्रमाणपत्रात विद्यार्थ्यांच्या धर्म किंवा मातृभाषेविषेयी उल्लेख केलेला नसल्यास अशा प्रकरणी संबंधित अल्पसंख्यक समाजाच्या नोंदणीकृत संघटनेने किंवा धर्म प्रमुखाने दिलेले प्रमाणपत्र, पालकांचे शपथपत्र ग्राह्य धरण्यात येईल.