Home | Maharashtra | Vidarva | Akola | robbery in businessman home akola

व्यापार्‍याच्या घरी अडीच लाखांची चोरी

प्रतिनिधी | Update - Jul 20, 2013, 10:03 AM IST

रणपिसे नगर येथील व्यापरी अनिल धोत्रे यांच्या घराचे लॅच तोडून चोरट्यांनी रोख रक्कम आणि दागिन्यांसह 2 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

  • robbery in businessman home akola

    अकोला - रणपिसे नगर येथील व्यापरी अनिल धोत्रे यांच्या घराचे लॅच तोडून चोरट्यांनी रोख रक्कम आणि दागिन्यांसह 2 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

    धोत्रे कुटुंबासह बंगलोर येथे गेले होते. शुक्रवारी ते परतल्यानंतर चोरीची घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाईन्स पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसरात चौकशी केली. श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना या वेळी पाचारण करण्यात आले होते. सिव्हिल लाईन्स पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धोत्रे यांच्या डायनिंग हॉलमधील एका कप्प्यातील पुस्तकाखाली कपाटाची चाबी ते ठेवत. नेमकी हिच चाबी घेऊन चोरट्यांनी कपाट उघडल्याने सारेच चक्रावलेत. चोरट्यांना या चाबीविषयी कशी माहिती मिळाली याचे पोलिसांनाही कोडे पडले आहे.

    देवही नाही सुटले..
    चोरट्यांनी डायनिंग हॉलमधील देवघरालाही लक्ष्य केले. देवघरातील चांदीचे देवपाट, देव, दिवेही लंपास केल्याचे पोलिसांनी सांगितले.

Trending