आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहू महाराजांनी समाजास माणुसकीचा मार्ग दाखवला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ- छत्रपतीराजर्षी शाहू महाराज थोर समाजसुधारक होते. तत्कालीन परिस्थितीतही त्यांनी अनेक सुधारणा घडवून आणल्या. माणुसकीचा धर्म सर्वात मोठा आहे. याची जाणीव त्यांना होती. त्यामुळे त्यांनी प्रत्येकास आपल्या कार्यातून माणुसकीचा मार्ग दाखवला, असे प्रतिपादन खा.भावना गवळी यांनी शुक्रवारी येथे केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे छत्रपती शाहु महाराज यांच्या जयंतीनिमित्त ‘सामाजिक न्यायदिन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. कार्यक्रमास जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, पोलिस अधीक्षक अखिलेश सिंग, समाजकल्याणचे सहायक आयुक्त विजय साळवे, समाजकल्याण अधिकारी जया राऊत, समाजकल्याणचे अधिकारी पीयूष चव्हाण, नीता अंबाडेकर, कलावती वाकोडे, रफीक रंगरेज आदी होते.
शाहु महाराजांनी त्यावेळी सर्वसामान्य नागरिकांसाठी संस्थांनात अनेक नवीन कायदे केले. सामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न त्यांनी केला असल्याचे भावना गवळी यांनी सांगितले. या वेळी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनीही शाहू महाराजांच्या शैक्षणिक कार्यावर प्रकाश टाकला. परंतु शिक्षणाकाडे दुर्लक्ष करता येत नाही, असे शिक्षणाचे महत्त्व सांगताना ते म्हणाले. शाहु महाराजांनी त्या काळात शिकसंचलन प्रा. घनश्याम दरणे यांनी तर आभार पीयूष चव्हाण यांनी मानले. विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.

गुणवंत विद्यार्थ्यांचा केला गौरव
सामाजिकन्यायदिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन येथे मागासवर्गीय प्रवर्गातील १० व्या वर्गातील यशवंतांना राजर्षी छत्रपती शाहु महाराज पुरस्कार देवून गौरवण्यात आले. त्यात विनया गाडेकर, गौरव आडे, शुभांगी बोरकर, प्रियंका राठोड, विक्रांत बगाटे, अंजली मनवर, विशाखा वासनिक, पवन राठोड, हरिष ताकसांडे, सूरज गायकवाड, अरुण जाधव, शिल्पा कवडे, प्रतीक्षा मते, तेजस मनवर, नागनाथ जाधव, रक्षा अडपावार, अश्विनी सूर्यवंशी, राणी नगराळे, गणपत गाडेकर, माधुरी अवझाडे, स्वाती जयदेव, दीक्षा खडसे, सुनीता रामजीरकर या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
सामाजिक न्याय दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी उद‌्‌घाटन खा. भावना गवळी. या वेळी जिल्हाधिकारी सिंह, सीईओ डॉ. कलशेट्टी, एसपी अखिलेशकुमार सिंह आदी.