Home | Maharashtra | Vidarva | Akola | shivani airport only on paper, no any movement till date

शिवणी विमानतळाच्या ‘टेकऑफ’ला ‘ब्रेक’

प्रबोध देशपांडे | Update - Jul 17, 2013, 09:29 AM IST

पश्चिम विदर्भाच्या विकासात मैलाचा दगड ठरणारे शिवणी विमानतळ केवळ कागदांवरील रेघांवर चर्चेत आहे.

 • shivani airport only on paper, no any movement till date

  अकोला- पश्चिम विदर्भाच्या विकासात मैलाचा दगड ठरणारे शिवणी विमानतळ केवळ कागदांवरील रेघांवर चर्चेत आहे. धावपट्टीचा विस्तार गेल्या अनेक वर्षांपासून रखडला असून, विद्यापीठाची जमीन विमानतळासाठी देण्याचा निर्णय अद्याप झाला नसल्याने पुन्हा या प्रश्‍नाने डोके वर काढले आहे.

  सध्या सुरू असलेल्या राज्यातील विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आमदार गोपीकिशन बाजोरिया शिवणी विमानतळाचा प्रश्न उचलून धरणार आहे. उद्योग विकासासाठी मूलभूत सोय म्हणून अकोला विमानतळाचा विस्तार महत्त्वाचा आहे. शिवणी विमानतळाच्या विस्तारीकरणात कृषी विद्यापीठाचे शरद सरोवराकडील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे प्रक्षेत्र सर्व्‍हे क्रमांक पाच व 13 बाधित होतील.

  विद्यापीठाचा विरोध
  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची जागा विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी देण्यास विद्यापीठाचा सुरुवातीपासून विरोध आहे. विस्तारीकरणात जाणारी जागा विद्यापीठासाठी आवश्यक असल्याने ती देण्यात येऊ नये, अशी चर्चा विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेच्या बैठकीतही झाल्याची माहिती आहे.

  उड्डाणाचे दिवास्वप्नच?
  शिवणी विमानतळाच्या धावपट्टीचे विस्तारीकरण रखडल्यामुळे सध्या तरी हे विमानतळ नेत्यांच्या ‘चार्टड प्लेन’पुरतेच र्मयादित आहे. धावपट्टीचे विस्तारीकरण होऊन शिवणी विमानतळावरून हवाई उड्डाण घेण्याचे अकोलेकरांचे स्वप्न आहे, ते पूर्ण होणार की, दिवास्वप्नच राहणार, असा प्रo्न आता निर्माण झाला आहे.

  धावपट्टीसाठी वादग्रस्त जमीन अडसर
  धावपट्टीच्या विस्तारासाठी पीडीकेव्हीची जमीन उपलब्ध आहे. मात्र, या जमीनप्रकरणी वादग्रस्त शेतीची मालकी तिसर्‍या पक्षाला देण्यात येऊ नये, असा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे.

  नेत्यांची बोलाचीच कढी
  गेल्या पाच महिन्यांच्या कालावधीत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी शिवणी विमानतळाचा प्रश्न निकाली काढून अत्याधुनिक सुविधेसह विमानतळ सुसज्ज करू, अशी घोषणा केली. मात्र, नेत्यांच्या त्या घोषणा बोलाचीच कढी स्वरूपाच्या ठरल्या.

  विमानतळाचा ‘विकास’ दृष्टिक्षेपात

  0 शिवणी विमानतळाचे सन 2009-10 मध्ये नूतनीकरण
  0 भारतीय विमानतळ प्राधिकरणाने ‘एटीआर-72’ प्रकारचे विमान सर्व ऋतूत विमानतळावर उतरवण्यासाठीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर
  0 1400 मी. लांबी धावपट्टीचा विस्तार 1800 मी. करण्याची गरज
  0 विस्तारीकरणासाठी 175 एकर जमिनीची आवश्यकता
  0 पीडीकेव्हीची 86.85 हेक्टर जागा विस्तारीकरणात जाणार
  0 कृषी विद्यापीठाचे प्रक्षेत्र सव्र्हे क्रमांक पाच व 13 बाधित होण्याची शक्यता
  0 राज्य शासनाचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश
  0 गेल्या अनेक वर्षांपासून प्रस्ताव रेंगाळला
  0 स्थानिक आमदारांचा विधिमंडळात वारंवार पाठपुरावा
  0 आठ लक्षवेधींसह अनेकवेळा विधिमंडळात चर्चा
  0 मुख्यमंत्र्यांसह चार मंत्र्यांचे शिवणी विमानतळ प्रश्‍न निकाली काढण्याचे आश्वासन
  0 मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची 2 मार्च 2013 रोजी अकोल्यात येऊन अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिवणी विमानतळाचा प्रo्न निकाली काढण्याची घोषणा
  0 उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे एप्रिल 2013 मध्ये अकोल्यात आढावा बैठकीदरम्यान शरद सरोवर तोडून शिवणी विमानतळाचे विस्तारीकरण करण्याचे निर्देश
  0 14 जुलै पर्यंत कार्यवाही शून्य
  0 आता अकोलेकरांचे लक्ष विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाकडे.!

  मुख्यमंत्र्यांनी आश्वासन पाळावे
  मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी अकोल्यात येऊन शिवणी विमानतळाचा प्रश्‍न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. ते त्यांनी पाळावे. विद्यापीठाची जागा अधिग्रहित करून शिवणी विमानतळ लवकर सुरू करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी. संजय धोत्रे, खासदार, अकोला.

  आश्वासनांचा पाऊस
  या प्रकाराला कुलगुरु जबाबदार आहेत. नेत्यांनी केवळ आश्वासनांचा पाऊस न पाडता कृती करावी. अन्यथा, लढा अधिक तीव्र करावा लागेल. गोपीकिशन बाजोरिया, आमदार, स्थानिक स्वराज्य संस्था.

Trending