आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारंजात लक्झरीचा \'सिनेस्टाइल\' अपघात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारंजा शहराजवळील क्रीडा संकुलाजवळ रस्त्याच्या कडेला अडकलेली लक्झरी. छाया: फिरोज शेकुवाले - Divya Marathi
चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारंजा शहराजवळील क्रीडा संकुलाजवळ रस्त्याच्या कडेला अडकलेली लक्झरी. छाया: फिरोज शेकुवाले
कारंजा- गुजरातराज्यातील सूरत येथील 'जय सीताराम' समूहाच्या लक्झरीचा २३ जून रोजी 'सिनेस्टाईल' अपघात झाला. पंक्चर काढल्यानंतर हवा भरल्यावर लक्झरी सरळ रस्त्याच्या कडेला जावून अडकली. सुदैवाने या घटनेत कुणालाही ईजा पोचली नाही. ही घटना सकाळी अकराच्या सुमारास स्थानिक क्रीडा संकुलाजवळ घडली.

याबाबत प्राप्त माहितीनुसार, गुजरात राज्यातील सूरत येथील 'जय सीताराम' समूहाची एमएच १२ एफसी ९००३ क्रमांकाची लक्झरी सोमवारए २२ जून रोजी पंक्चर झाली होती. त्यामुळे लक्झरी स्थानिक बायपासवर रात्रभर अडकून पडली. २३ जून रोजी ती सकाळी प्रवाशी घेवून सूरतकडे निघणार होती. त्यामुळे सकाळी स्थानिक क्रीडा संकुलजवळ पंक्चर काढण्यासाठी लक्झरीला जॅक लावण्यात आला होता. पंक्चर निघाल्यानंतर हवा भरल्यावर अचानक लक्झरी पुढे निघाली. त्यामुळे तेथे उपस्थित चालक, क्लिनर इतर गोंधळून गेले. लक्झरी पुढे सरकत सरकत सरळ रस्त्याच्या कडेला जावून अडकली. हा सर्व प्रकार 'सिनेस्टाईल' वाटत होता.बघ्यांनी घटनास्थळी प्रचंड गर्दी केली होती.
बातम्या आणखी आहेत...