आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनहितासाठीचे आंदोलन भोवणार, भाजपच्‍या नगरसेवकांना हद्दपारीची नोटीस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- ‘पार्टी विथ डिफरन्स’चा टेंभा मिरवणार्‍या भाजपच्या तीन नगरसेवकांच्या हद्दपारीच्या अनुषंगाने चौकशी करण्याचे आदेश उपविभागीय दंडाधिकार्‍यांनी उपविभागीय पोलिस अधिकार्‍यांना दिले आहेत. त्यानुसार, चौकशीला प्रारंभ झाला आहे, तसेच यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकाचाही समावेश आहे.

सर्वपक्षीय नगरसेवक आणि महापालिका प्रशासनामुळे शहर विकासाचे तीनतेरा वाजले आहेत. महापालिकेची एकही सभा गोंधळाविना पार पडत नाही. विरोधक आणि सत्ताधारी कुरघोडीचे राजकारण करण्यातच धन्यता मानतात. जनहिताचा देखावा करीत विरोधी पक्षांचे नगरसेवक सभागृहातील लढाई रस्त्यावरही लढतात. अशावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. वेळोवेळी केलेल्या आंदोलनांमुळे विरोधी नगरसेवकांविरुद्ध गुन्हेही दाखल होतात. पोलिसांनी दखलपात्र, अदखलपात्र गुन्हे दाखल असलेल्या चार नगरसेवकांविरुद्ध हद्दपारीची कारवाई करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

पोलिस प्रशासनाने भाजपचे नगरसेवक अजय रमेशचंद्र शर्मा, राजेश्वरी जगदीश शर्मा, सुरेश अंधारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मोहंमद फजील उर्फ फजलू अब्दुल करीम यांच्याविरुद्धचा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकार्‍यांकडे सादर केला. उपविभागीय दंडाधिकार्‍यांनी हा प्रस्ताव चौकशीसाठी उपविभागीय पोलिस अधिकार्‍यांकडे पाठवला आहे. त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाने त्यांची चौकशी सुरू केली आहे. संबंधित नगरसेवकांना नोटीसही बजावण्यात आली आहे.

दरम्यान, नोटीस मिळालेल्या अजय शर्मा यांनी उपविभागीय पोलिस अधिकार्‍यांकडे गुन्ह्याबाबत माहिती अधिकारांतर्गत माहिती मागवली आहे. ही माहिती मिळाल्यानंतर आपली भूमिका स्पष्ट करू, असेही त्यांनी सांगितले.