आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिरवणुकीवर दगड, उमरखेडमध्ये तणाव, ३ पोलिसांसह अनेक जखमी, स्थिती नियंत्रणात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उमरखेड - शहरातील रोहिली पुऱ्यातून निघालेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीवर गुरुवारी १५ सप्टेंबरला सायंकाळच्या सुमारास दगडफेक झाली. यात तीन पोलिस कर्मचाऱ्यांसह मिरवणुकीत सहभागी १० ते १५ नागरिक जखमी झाले. या घटनेमुळे शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली. पोलिसांनी घटनेची गंभीरता लक्षात घेऊन दोन अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या. त्याचवेळी आलेल्या पावसामुळे परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात पोलिसांना यश आले. या घटनेची माहिती मिळताच रात्री उशिरा जिल्हा पोलिस अधीक्षकांनी उमरखेडला भेट दिली. या संदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उमरखेड येथील शिवाजी वॉर्ड परिसरातील छावा गणेश मंडळाने दुपारच्या सुमारास मिरवणूक काढली होती. दरम्यान, रोहिली पुऱ्यातून मिरवणूक जात होती. अशात मिरवणुकीवर दकडफेक झाली. या वेळी पोलिस बंदोबस्त तोकडा होता. त्यामुळे काही वेळातच गोंधळ निर्माण होवून परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी सुद्धा दगडफेक सुरू असल्यामुळे एका पीएसआयसह इतर दोन पोलिस कर्मचारी आणि मिरवणुकीतील आठ ते दहा नागरिक जखमी झाले. यातील जखमींना जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले असून, तीन जणांना नांदेड येथे हलवल्याचे सांगण्यात येत आहे. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या दोन नळकांड्या फोडल्या. दगडफेक झाल्याचे कळताच शहरातील इतर गणेश मंडळांनी मिरवणूक जागेवरच थांबवली. या वेळी आलेल्या पावसामुळे परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात पोलिसांना यश आले. या घटनेची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांना मिळाली असता, त्यांनी रात्री साडे आठ वाजताच्या सुमारास उमरखेड गाठले. एकंदरीत परिस्थिती नियंत्रणात राहावी, या दृष्टीने शांतता राखण्याचे आवाहन पोलिस विभागाने केले आहे.
पुढील स्‍लाइडवर वाचा, महागावात गणपती विसर्जनाच्या टॅक्टरमधून काठ्या जप्त
बातम्या आणखी आहेत...