आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यात दीड लाख नवे वृक्ष, विभागीय आढावा बैठकीत ठरवला गेला या वर्षीचा आकडा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - वैश्विक उष्णतेत होणारी वाढ आणि हवामानातील बदलांची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न म्हणून जिल्ह्यात या वर्षी दीड लाख नवी झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे. ही उद्दिष्टपूर्ती लोकसहभागातून केली जाणार असून, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर यांनी या मोहिमेचा आढावा घेतला.
या मोहिमेसाठी ते जुलै हा वन महोत्सवाचा कालावधी निवडण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून वृक्षाच्छादन वाढवून हरित महाराष्ट्राची संकल्पना प्रत्यक्षात साकार केली जाणार आहे. दरम्यान, विभागातील पाचही जिल्ह्यांसाठी लाख ७९ हजार ३१६ वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, उद्दिष्टपूर्तीसाठी आरखडा कृती कार्यक्रमही तयार करण्यात आला आहे. या कृती कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देशही विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर यांनी आज दिले आहेत. वायुमंडलाचे असंतुलन, निसर्गाचा असमतोल, वाढते प्रदूषण आणि त्यातून होत असलेले घातक पर्यावरणीय बदल आदी बाबींमुळे जागतिक तापमानात वाढ होत आहे. त्याचा परिणाम म्हणून निसर्ग आणि ऋतुचक्रात बदल, अनियमित पर्जन्यमान, अतिवृष्टी किंवा दुष्काळ या नैसर्गिक समस्या डोके वर काढत आहेत. या संपूर्ण अडचणींवर मात करण्यासाठी तसेच पर्यावरणाचे संरक्षण संवर्धन करण्यासाठी वृक्षारोपण आवश्यक असल्याचे शासनाचे मत आहे. वनमहोत्सवाच्या कालावधीत राज्यभरात कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हानिहाय रोपांच्या पूर्ततेसंबंधीचा आढावाही विभागीय आयुक्तांनी घेतला. बैठकीला पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, मुख्य वनसंरक्षक संजीव गौड, यवतमाळ सर्कलचे मुख्य वनसंरक्षक व्ही. व्ही. गुरमे, पोलिस महानिरीक्षक संजीवकुमार सिंघल, पोलिस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, उपवनसंरक्षक निनू सोमराज, उपसंचालक मसराम, जलसंधारण विभागाचे उपअभियंता पगारे इतर विभागप्रमुख उपस्थित होते.

रोपांची उपलब्धता
वन विभागाच्या अकोला मध्यवर्ती रोपवाटिकेत आवळा, चिंच, करंजी, अंजन, सागवान, खैर, सिसू, निंब, कडुनिंब यांसारखी विविध रोपे तयार करण्यात आली आहेत. जुलै रोजी करण्यात येणाऱ्या सामूहिक वृक्षारोपण मोहिमेसाठी खासगी नर्सरीधारकाकडूनसुद्धा रोपे उपलब्ध करून घेण्यात आली आहेत.

तांत्रिक तपशील संकेतस्थळावर
^उद्दिष्ट गाठण्यासाठी शासकीय यंत्रणांनी कोणती झाडे लावावीत, खड्ड्यांचा व्यास किती असावा, किती फुटाची झाडे कार्यालयाच्या आवारात लावण्यासाठी योग्य आहेत, पाणी किती द्यावे यांसह अन्य प्रश्नासंबंधीची माहिती वन विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. विभागप्रमुखांनी त्याद्वारे आपापल्या कार्यालयांचा कार्यक्रम तयार करावा.'' संजीव गौड, मुख्यवनसंरक्षक.

बातम्या आणखी आहेत...