आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक कोटी हाेणार खर्च नावीन्यपूर्ण विकासावर; दोन ड्रोन, सीसीटिव्ही कॅमेऱ्यांची होणार खरेदी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - अकोला शहराला नावीन्यपूर्ण विकासाचे पंख लावण्यासाठी सुमारे एक कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. यातून सीसीटिव्ही कॅमेरे, दोन ड्रोन, शुध्द पाण्याच्या पुरवठ्यासाठी आरओ प्युरिफायर, जनरेटर अशी यंत्रे खरेदी केली जाणार असून त्यांचा िवविध प्रकल्पांसाठी वापर केला जाणार आहे.

या प्रकल्पांना अलीकडेच जिल्हा नियोजन समितीने मंजुरी दिली असून त्यासाठी ९८ लाख ५० हजार रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे नियोजन विभागाने स्पष्ट केले आहे. यातील साडे लाख रुपयांच्या खर्चाने जिल्हािधकारी कार्यालयासाठी जनरेटर खरेदी केले जाणार असून तब्बल ४२ लाख रुपये खर्चून येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात मानवी दूध पेढी प्रकल्प उभा केला जाणार अाहे.

याशिवाय शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी, ती नियमानुकूल असावी आणि अनिष्ट घटनांवर लक्ष असावे यासाठी येथील महत्वाच्या चौकात सीसीटिव्ही कॅमेरे लावले जाणार आहे. त्यासाठी २१ लाख रुपयांचा खर्च केला जाणार आहे.

ड्रोनखरेदीसाठी लाख
राज्यशासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या जलयुक्त शिवाराचे सोशल ऑडिट करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व कामांचे चित्रीकरण केले जाणार असून त्यासाठी दोन ड्रोन खरेदी केले जाणार आहेत. यासाठी लाख रुपयांची तरतूद केली आहे.

जिल्हा नियोजन समितीच्या बजेटच्या अर्धा टक्के रक्कम जिल्हास्तरीय तर तेवढीच रक्कम राज्यस्तरीय नावीन्यपूर्ण योजनांसाठी राखीव ठेवण्यात येत असते. लोकप्रतिनिधींच्या निधीतून जी कामे अनुज्ञेय नाहीत, परंतु ती अत्यावश्यक अाहेत, अशा कामांसाठी हा निधी वापरला जातो, असे जिल्हा नियोजन अधिकारी ज्ञानेश्वर आंबेकर यांनी सांगितले,
बातम्या आणखी आहेत...