आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला: दहा लाखांचा गुटखा जप्त; चौघांना अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या अखत्यारीतील विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांच्या नेतृत्वातील पथकाने शहराच्या विविध भागातील प्रतिष्ठानांवर गुरुवारी सायंकाळी छापे मारले. त्यात सुमारे ते १० लाखाचा गुटखा जप्त करण्यात आला असून आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. 
 
गुटखा बंदी असतानाही शहराच्या विविध भागामध्ये गुटख्याची विक्री होत असल्याची माहिती पथकाला मिळाल्याने कारवाई करण्यात आली. कारवाईमध्ये घनश्याम अग्रवाल जुना भाजी बाजार, चमन सीताराम अग्रवाल, चंद्र नारायण लालचंद अग्रवाल, नितीन लालचंद अग्रवाल यांचे प्रतिष्ठान तर श्याम सीताराम अग्रवाल यांच्या राजपुऱ्यातील निवासस्थानातून गुटखा जप्त करण्यात आला. गेल्या तीन चार महिन्यातील ही चौथी कारवाई आहे. दोन कारवाया पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने, एक वाहतूक शाखेने तर एक कारवाई मूर्तिजापूर पोलिसांनी केली होती. 
 
घनश्याम अग्रवाल यांच्याविरुद्ध दुसरी कारवाई : याप्रकरणातील आरोपी घनश्याम अग्रवाल यांच्याविरुद्ध दोन महिन्यांपूर्वी अशीच कारवाई करण्यात आली होती. गुरुवारच्या कारवाईमध्ये देखील तेच आरोपी आहेत. 
 
गुटखा नेमका येतो तरी कोठून ? 
अकोला शहरामध्ये गुटखा मोठ्या प्रमाणामध्ये येतो आहे. त्यावर रोख बसवण्यासाठी उपाय योजले जात नाही का, ही चर्चा होत आहे. बंदी असूनही गुटखा कुठल्या माध्यमातून येतो त्याला आळा घातल्यास मोठ्या प्रमाणात होत असलेली गुटख्याची विक्री थांबू शकते, असेही बोलले जात आहे. काही विक्रेत्यांविरुद्ध कारवाई होऊनही पुन्हा त्यांच्याकडूनच गुटखा पकडला जातो, असेही आढळत आहे. त्यावर जरब बसण्याची गरज आहे. गुटखा जप्तीच्या कारवाई अकोल्यातच नाही तर तालुक्यातही होत असतात. त्यांच्याविरुद्धही कारवाया होण्याची आवश्यकता आहे. 
बातम्या आणखी आहेत...