आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एनएसयूआयकडून दोन दिवसांचा अल्टिमेटम, केंद्रीय प्रवेश पद्धती लागू करण्याची केली मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय पद्धतीच लागू केली जावी, या मागणीसाठी एनएसयूआयने आज, शुक्रवारी पुन्हा शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेत त्यांना दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला. विद्यार्थी-पालकांची फसवणूक टाळणारी केंद्रीय प्रवेश पद्धत लागू करण्यासोबतच माहिती पुस्तिकेच्या नावाखाली स्वीकारलेले शुल्क विद्यार्थ्यांना परत करावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
अकरावीचे प्रवेश परंपरागत पद्धतीने होत असल्यानेे सामान्य पालकांची आर्थिक पिळवणूक होत अाहे. गुणवत्ता असूनही अनेक विद्यार्थी नामांकित महाविद्यालयांतील प्रवेशांपासून दूर राहत आहेत. महाविद्यालयांनी छुप्या मार्गांनी सुरू ठेवलेल्या डोनेशन प्रक्रियेमुळे समस्या निर्माण झाली आहे. केंद्रीय प्रवेश पद्धतीत अशी फसगत होत नाही. त्यामुळे ही पद्धत चालू शैक्षणिक सत्रापासूनच लागू करण्याची मागणी करत एनएसयूआयने प्रथम निवेदन नंतर ठिय्या आंदोलन केले होते.

दरम्यान, ठिय्या आंदोलनाच्या वेळी अधिकाऱ्यांनी समझोता करत प्राचार्य मुख्याध्यापकांची बैठक बोलावण्याचे मान्य केले. मात्र, आंदोलनाच्या दोन दिवसानंतर झालेल्या बैठकीत हा निर्णय फिरवून पुढच्या सत्रापासून लागू करण्याचे ठरवण्यात आले. त्यामुळे एनएसयूआयसह अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मनसेने नाराजी व्यक्त केली असून, जिल्हाधिकारी पालकमंत्र्यांकडे धाव घेतली आहे. मात्र, तरीही प्रश्न कायम राहिल्याने एनएसयूआयने आक्रमक होत आपला मोर्चा पुन्हा शिक्षण विभागाकडे वळवला आहे.

‘त्या’विद्यार्थ्यांना मिळणार पैसे परत : महाविद्यालयीनप्रवेशासाठी आवश्यक असलेली माहिती पुस्तिका प्रवेश अर्ज विद्यार्थ्यांना मोफत पुरवले जावे, असा शासनादेश आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशासाठी माहिती पुस्तिका प्रवेश अर्ज खरेदी केले, त्या सर्वांना पैसे परत करण्याची मागणी एनएसयूआयने केली आहे. विशेष असे की, शिक्षणाधिकाऱ्यांनीही ही बाब मान्य केली आहे.
बातम्या आणखी आहेत...