आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चिखलीतून 12 लाख रुपयाचा गुटखा, सुंगधी तंबाखू जप्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चिखली - शहराच्या मध्य वस्तीत असलेल्या एका दुकानातून गुटखा विकत असताना दुकान मालकासह एकास अन्न औषध प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी पकडले. यावेळी दुकानासह गोडावूनची झडती घेतली असता त्यामध्ये १२ लाख हजार ७४० रुपयाचा गुटखा सुगंधी तंबाखू आढळून आला. हा सर्व गुटखा तंबाखू जप्त करण्यात आला. ही कारवाई आज ऑक्टोबर रोजी करण्यात आली. 
 
चिखली शहरातील बाबू लॉज जवळील रईस जर्दा या दुकानावर छापा मारला असता दुकान मालक शे. रईस शे. अफसर वय ३२ हा युवक गुटख्याची विक्री करताना आढळून आला. त्याने दिलेल्या माहितीवरून तेथून जवळ असलेल्या त्याच्याच गोडावून मध्ये असलेला गुटखा सुगंधी तंबाखू जप्त करण्यात आली. त्यावेळी तेथे उपस्थित असलेला अजीम खाॅ उस्मान खाॅ वय ३७ याला ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी गोपाल माहुरे, संतोष सुरोशिया, किशोर साळुंके, कर्मचारी श्रीकांत मोरे, समाधान जाधव, ठाणेदार महेंद्र देशमुख , उपनिरीक्षक गवारगुरु, राजू सोनुने, शेगोकार महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी पार पाडली. 
बातम्या आणखी आहेत...