आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहर विकासासाठी १३५ कोटींचा निधी द्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - मनपाची झालेली हद्दवाढ लक्षात घेताविकास कामांसाठी १३५ कोटींचा निधी द्यावा, अशी मागणी आमदार गोपिकिशन बाजोरीया यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनातून केली आहे.
महापालिकेची हद्दवाढ झाली असून २८ चौरस किलोमिटर क्षेत्रफळ आता १२४ चौरस किलोमिटर झाली आहे. नव्याने समाविष्ट झालेल्या २४ गावांमध्ये मुलभूत सोयी सुविधा पुरवणे गरजेचे आहे. या भागात रस्ते, नाले, पथदिवे आदी विविध विकास कामे करणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन या २४ गावांमध्ये विकास कामे करण्यासाठी तसेच मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करण्यासाठी विशेष निधीची तरतुद करुन १०० कोटी रुपयाचा निधी द्यावा. तसेच शहरातील जुने आरटीओ ऑफीस ते संत तुकाराम चौक या मार्गाच्या डांंबरीकरणाकरीता दहा कोटी, गणपती विसर्जन मिरवणुक मार्गाच्या कॉक्रीटीकरणासाठी २० कोटी, मदनलाल धिंग्रा चौक ते महाराणा प्रताव चौक या मार्गाच्या डांबरीकरणासाठी पाच कोटी, उमरी आणि गडंकी येथील स्मशानभूमीच्या नुतनीकरणासाठी ५० लाख तर मुस्लिम कब्रस्थानसाठी २५ लाख, सरकारी बगीचा आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहाच्या सौंदर्यीकरणासाठी असा एकुण १३५ कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करावा, अशी मागणी आमदार गोपिकिशन बाजोरीया यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.
बातम्या आणखी आहेत...